नागपूरला नवी ओळख देणार
By Admin | Updated: October 5, 2014 00:55 IST2014-10-05T00:55:14+5:302014-10-05T00:55:14+5:30
देशाचे मध्यवर्ती ठिकाण, संत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराला, विकासाचे शहर, आदर्श शहर म्हणून नवी ओळख देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नागपूरला नवी ओळख देणार
दक्षिण-पश्चिममध्ये भाजपाची प्रचार रॅली
नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण, संत्र्याचे शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूर शहराला, विकासाचे शहर, आदर्श शहर म्हणून नवी ओळख देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दक्षिण-पश्चिम नागपूरात देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार रॅली काढून जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. खामला येथून सकाळी प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीने सावरकरनगर, लक्ष्मीनगर, एलएडी कॉलेज, व्हीआरसी गेट, माटे चौक, गोपालनगर, त्रिमूर्तीनगर, प्रतापनगर या परिसरात भ्रमण केले. यादरम्यान फडणवीस यांनी परिसरातील मतदारांशी संपर्क केला. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली. दसऱ्याच्या शुभेच्छाही दिल्या.
या रॅलीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह नगरसेवक संदीप जोशी, गोपाल बोहरे, संजय बंगाले, विवेक तरासे, डॉ. सुनील कांबळे, सरोज बहादुरे, दीपक तेलरांधे, अमित देशपांडे, राजू राऊत, अभय देशपांडे, अतुल बांगरे, डॉ. खत्री, पराग जोशी, संदीप चिमोटे, आनंद टोळ, गजानन निशितकर, गिरीश श्रीरामे, मंदार चितळे, आनंद महाजन, आशिष पाठक, सुरेंद्र पांडे, सचिन कारळकर, अश्विनी डबली, सारंग देव, गोपाल वानखेडे, अविनाश घुसे, नितीन पंडे, अभय देशमुख, श्रीकांत लांडगे, अॅड. नितीन तेलगोटे, गिरीश देशमुख, पल्लवी श्यामकुळे, विनोद पांडे, पीयूष जोशी, उषा निशितकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)