शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

‘खोके द्या, तुम्हाला मंत्री करून देतो’! भाजप अध्यक्षांच्या नावाने चक्क आमदारांवरच फेकले जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2023 21:53 IST

Nagpur News गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली व देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला.

योगेश पांडेनागपूर : राजकारणातील घोडेबाजारात खुर्चीसाठी चढाओढ असताना याच स्पर्धेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत गुजरातमधील एका व्यक्तीने चक्क भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी केली व देशातील सहा आमदारांना गंडविण्याचा प्रयत्न केला.

त्याने राज्य किंवा केंद्रात मंत्रीपद मिळवून देतो असा दावा करत आमदारांना कोट्यवधींची मागणी केली. भाजपचे आमदार विकास कुंभारे यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व त्यानंतर आरोपीची पोलखोल झाली. नीरज सिंह राठोड (मोरबी, अहमदाबाद) असे तोतया स्वीय सहायकाचे नाव असून या प्रकारामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार राठोड याने भाजपच्या सहा आमदारांना मंत्रीपदासाठी फोन केले होते. यात मध्य नागपूरचे आ.विकास कुंभारे, कामठीचे आ.टेकचंद सावरकर, हिंगोलीचे आ. तान्हाजी मुटकुळे, जालन्यातील बदनापूरचे आ.नारायण कुचे, तसेच गोवा येथील आ. प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आ. बाशा चँग यांचा समावेश आहे. दोन आठवड्यांअगोदर विकास कुंभारे यांना नीरज सिंह राठोड याचा फोन आला. त्याने जे.पी.नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगत अगोदर एका कार्यक्रमासाठी सहकार्य हवे आहे असे म्हटले. त्यानंतर तुमचे नाव मंत्रीपदासाठी सुरू असून तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर त्याने अगोदर १.६६ लाख व नंतर आणखी लागले तर पैसे देण्यासाठी तयार रहा असे सांगितले.

त्यानंतर त्याने तीन ते चार वेळा आ.कुंभारे यांना फोन केला. मात्र राज्यात कधी मंत्रीपदाबाबत विचारणा झाली नसताना अचानक दिल्लीहून अशी विचारणा होते व पैसे मागितले जात असल्याने कुंभारे यांना संशय आला. त्यांनी भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता असे काहीच नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कुंभारे यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेत त्यांच्या कानावर हा प्रकार टाकला. तसेच तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत नीरजला गुजरातमध्ये जाऊन अटक केली. त्याला नागपुरात आणण्यात येणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क ?नीरजला नागपुरात आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याने केवळ हेच सहा आमदार नव्हे तर भाजपच्या अनेक आमदारांशी संपर्क साधला असल्याची शक्यता आहे. त्याच्या चौकशीतून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे. सोबतच त्याच्यासोबत आणखी कोण साथीदार आहेत व त्याचा बोलविता धनी कोण आहे याचीदेखील चौकशी सुरू आहे.

पक्षनिधीमुळे आला संशयनीरजने कुंभारे यांना केलेल्या प्रत्येक फोनमध्ये मंत्रीपदाच्या बदल्यात पक्षनिधीसाठी पैसे द्यावे लागतील असे म्हटले. पक्षनिधीवर त्याचा जास्त जोर असायचा व त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आमदारांना त्याचा संशय आला, असे कुंभारे यांनी सांगितले. त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी चक्क एक लिंकदेखील त्यांना पाठविली होती, असे कुंभारे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी