शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

वकिली व्यवसायाला सेवाभावी वृत्तीची जोड द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:06 IST

कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

ठळक मुद्देन्या. भूषण गवई : वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोणताही व्यवसाय हा सेवाभावी वृत्तीने करायला पाहिजे. वकिली व्यवसायाला सुध्दा सेवाभावी वृत्तीची जोड असल्यास यशस्वी होता येईल, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.नागपूर जिल्हा बार असोसिएशन आणि अ‍ॅड. एम. आर. डागा स्मृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी वकिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायमंदिरातील न्यायाधीश सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रमुख जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे, वरिष्ठ वकील अविनाश गुप्ता, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे उपस्थित होते.न्या. गवई म्हणाले की अ‍ॅड. एम. आर. डागा राज्यातील ख्यातनाम फौजदारी वकील होते. सेशन कोर्ट, हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टात काम करण्याची त्यांची वेगळी कार्यशैली होती. बचाव पक्षाची मुद्देसूद बाजू मांडत होते. ही त्यांच्यातील कला वकिलांना मार्गदर्शन ठरणारी आहे. बचाव पक्षाची बाजू त्यांनी अनेकदा नि:शुल्क लढली. सेशन कोर्ट ते सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांनी काही प्रकरणे नि:शुल्क लढविली. न्यायालयात आपली बाजू मांडताना ते कधी चढ्या आवाजाने बोलत नव्हते. त्यांनी आपली बाजू नेहमी नम्रपणे मांडली होती. ते वयाने मला वडिलधारे होते. ज्यावेळी मी सरकारी वकील होतो, त्यावेळी गोेंदिया येथे एका खून प्रकरणाच्या ट्रायलमध्ये ते बचाव पक्षाकडून तर मी सरकारतर्फे बाजू मांडत होतो. बहुदा दोन्ही वकील कोर्ट रूममध्ये प्रकरणात एकमेकांच्या विरोधात असतात आणि कोर्ट रूमबाहेरही विरोधात असतात. परंतु गोंदिया येथे सुनावणीनंतर त्यांनी मला आवाज दिला आणि मित्रासारखे बोलले. त्यांच्यात वैरभाव आणि शत्रुत्वाची भावना नव्हती. ते मित्रत्वाने नेहमी वागले. वकिलापेक्षा ते एक चांगले व्यक्ती होते. ते स्वत: इन्स्टिट्युशन होते. असे गुण फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतात. त्यांच्या स्मरणार्थ वकिलांसाठी विविध कार्यक्रम जिल्हा बार असोसिएनशन आणि समितीतर्फे राबविण्यात येणार आहे, ही आनंदाची बाब आहे.अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, कारागृहातून साध्या पोस्ट कार्डवर अ‍ॅड. एम. आर. डागा यांना पत्र मिळाले तरी ते त्यांच्यासाठी न्यायालयात बाजू मांडत होते. कारागृहात त्यांना देव मानले जात होते.याप्रसंगी न्या. प्रसन्ना वराळे, न्या. सुनील शुक्रे, न्या. विनय देशपांडे, न्या. रोहित देव तसेच हायकोटर्चिे मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांच्यासह मोठ्या प्रमाणात वकील वर्ग उपस्थित होता. संचालन अ‍ॅड. राधिका बजाज यांनी केले. आभार अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी मानले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर