कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देऊ
By Admin | Updated: October 3, 2014 02:51 IST2014-10-03T02:51:37+5:302014-10-03T02:51:37+5:30
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कामठी मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र मुळक यांनी गुरुवारी नागपूर ग्रामीण...

कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देऊ
नागपूर : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कामठी मतदारसंघाचे उमेदवार राजेंद्र मुळक यांनी गुरुवारी नागपूर ग्रामीण तालुक्याचा प्रचार दौरा केला. यावेळी कष्टकरी, पीडितांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
प्रचार दौऱ्यादरम्यान हुडकेश्वर (खुर्द) येथे त्यांची सभा झाली. त्यात ते बोलत होते. कामठी मतदारसंघातील रचनात्मक आणि सकारात्मक कार्याची उभारणी करणार असल्याचे सांगत शेवटच्या घटकाच्या सुखदु:खाची जाणीव असून त्यांच्या समस्या दूर करण्यास आपण प्राधान्य देऊ, असे त्यांनी सांगितले.
नागपूर ग्रामीण तालुक्यातील हुडकेश्वर (बु.), पिपळा, किरणापूर, धामना, चिकना, नवेगाव, निंबा, टाकळी, कळमना, अड्याळी, विहीरगाव, उंबरगाव, गोन्ही सिम, बहादुरा आदी भागात प्रचारसभा झाल्या. नरसाळा येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खरबी येथे सभा झाली.
पदयात्रेत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, देवराव रडके, डी. डी. सोनटक्के, जयंत दळवी, किशोर वानखेडे, दिवाकर जंगले, अजय राऊत, प्रभू भेंडे, संदीप तेलरांधे, गणेश चुरड, रामदास कांबळे, अर्जुन गुरकुडे, धनराज वलोकार, सुरेश भोसकर, चंद्रकांत पारधी, तुळशीराम खंदारे, शिवाजी घापणे, प्रभाकर कोकाटे, फकिरा चौधरी, भाऊराव नागपुरे, रामभाऊ धांडे, अभय भगत, विनोद चरडे, व्यंकट भांगे, बापू मानकर, नीळकंठ वांगे, गुलाब धांडे, अनिल आगलावे, खंडुजी मसराम, नरेश शिंगणे, उमेश ठाकरे, मारुती हाते, विष्णू मिसाळ, नरेंद्र बाराहाते, अनिल जवंजाळ, प्रवीण शिंदे, रामकृष्ण आचार्य, विनोद बानाईत, नितीन राऊत, अजय फनके, चंद्रशेखर राऊत, पुरुषोत्तम राऊत, दिनकर ठेंगे, नारायण कापसे, हरिभाऊ शिंदे, नवीन ठाकूर, भगवान घोडमारे, रमेश भिल्लार, रमेश गजघाटे, रोशन खडसे, संदीप खडसे, अजय नागपुरे, मोरेश्वर पडोळे, प्रमोद चोपडे, नाना पराळे, परशुराम पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)