घरकामगार महिलांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 21:40 IST2018-07-16T21:39:28+5:302018-07-16T21:40:08+5:30
घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टने विधिमंडळावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले.

घरकामगार महिलांना न्याय द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरकामगार महिलांना ५०० ते ६०० रुपये महिना देऊन त्यांची पिळवणूक केली जात आहे. या महिलांना न्याय मिळण्यासाठी राज्य घरकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना झाली. परंतु महिलांना अद्यापही न्याय मिळाला नाही. याविरोधात सोमवारी नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेलफेअर ट्रस्टने विधिमंडळावर मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. घरकाम हे काम आहे व हे काम करणारे कामगार आहेत. या ठरावाला भारतासह १८७ देशाने मान्यता दिली. परंतु ठरावाला धरून केंद्र सरकारने कायदाच केला नसल्याने घरकामगार आपल्या हक्कांपासून वंचित असल्याची खंत मोर्चाच्या शिष्टंमडळाने मांडली.
या मोर्चाचे नेतृत्व दिनेश मिश्रा यांनी केले. घरकामगार महिलांना कामगार हक्क द्या, संघटित कामगार विभागाप्रमाणे रोजगार व सेवा-शर्ती लागू करा, सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन लागू करा, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा आदी मागण्या या मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या.