शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

हात दे तू साथ दे, प्रित दे अभिजात दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:39 PM

माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले.

ठळक मुद्दे व्हॅलेंटाईन डे : प्रेमाच्या लाल रंगात न्हाहून निघणार तरुणाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रेम. आहे तसा अडीच अक्षराचाच शब्द. पण, त्याची अथांगता जगाला व्यापून उरणारी आहे. इतिहासाचे कोणतेही पान उलटून बघा. मग तो काळ कृष्ण-राधेचा असेल, लैला-मजनूचा असेल वा रोमियो-जुलियटचा. भूगोलाचे चित्र वेगळे असले तरी प्रेम जसे सत्य अन् शास्वत आहे तसेच सार्वत्रिकही आहे. म्हणूनच अगदी प्रारंभापासून विरोधाच्या वादळ वाऱ्यातही प्रेमाची ही उज्ज्वल पणती कायम तेवत आली आहे. या सर्व काळांमध्ये व्हॅलेंटाईन डे नव्हता. पण, म्हणून प्रेमाची अभिव्यक्ती कधी थांबली नाही. ती अखंड अविरत सुरूच आहे. हो...व्हॅलेंटाईन डेने या अभिव्यक्तीचा हा कॅनव्हास आणखी विस्तारला हे खरे आहे आणि म्हणूनच हा प्रेमदिवस जगभरातील तरुणाईचा जीव की प्राण झाला आहे. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेलाही प्रेमाच्या लाल रंगात तरुणाई न्हाहून निघणार आहे. शहरात तर यासाठी जय्यत तयारी झाली आहे. पण, प्रेमाचा हा उत्सव केवळ तरुणाईचाच नाही. माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले. याचा अर्थ प्रेमावर विश्वास असणाऱ्या व प्रेमानेच जोडल्या जाणाऱ्या प्रत्येक नात्यांचा हा उत्सव आहे. लहान मुलांना त्यांचे आजी, आजोबा अत्यंत प्रिय असतात तर वृध्दांना त्यांची नातवंडे, पणतवंडे लाडकी असतात. यांच्यामधल्या सगळ्या पिढ्यांमधील आप्तांचे आपल्याशी मधुर संबंध असतात. शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, सहकारी वगैरे अनेक लोकांशी आपला स्नेह जुळतो. अनेक नेते, अभिनेते, खेळाडू, गायक, गायिका आणि इतर कलाकार आपल्याला अगदी मनापासून आवडतात. ही आवड व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. म्हणूनच सर्वच वयोगटातील मंडळी सेलिब्रेशनसाठी उत्सुक आहेत.शहरात पोहोचला गुलाबांचा जखिरागुलाब हे प्रेमाच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे. त्यामुळे व्हॅलेंटाईन डेला गुलाबांची मागणी शतपटीने वाढत असते. ही बाब लक्षात घेऊन फूल विक्रेत्यांनी गुलाबांचा मोठा जखिरा मागविला आहे. विविध दुकानांमधील लालबुंद गुलाबांचे गुच्छे लक्ष वेधून घेत आहेत.हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी शहरातील हॉटेल्सही सज्ज झाली आहेत. लाल रंगाच्या टी-शर्टने कपडयांची दुकाने सजली आहेत. भेटवस्तू खरेदीचा आलेखही अचानक वाढला आहे. थोडक्यात या प्रेमोत्सवाचा रंग अवघ्या शहरावर चढला आहे.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेnagpurनागपूर