संशयास्पद सोनोग्राफी केंद्र्राची माहिती द्या, बक्षीस मिळवा
By Admin | Updated: March 15, 2017 02:34 IST2017-03-15T02:34:30+5:302017-03-15T02:34:30+5:30
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून प्रशासनाकडे नोंदणी झालेल्या सर्व केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत आहे.

संशयास्पद सोनोग्राफी केंद्र्राची माहिती द्या, बक्षीस मिळवा
जिल्हाधिकारी कुर्वे यांचे आवाहन : पीसीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी
नागपूर : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान प्रतिबंध कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू असून प्रशासनाकडे नोंदणी झालेल्या सर्व केंद्राची नियमित तपासणी करण्यात येत आहे. सोनोग्राफी केंद्र्रासंदर्भात तक्रारी असल्यास अथवा संशयास्पद सोनोग्राफी केंद्रांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना बक्षीस देण्याची योजना आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
स्त्री जन्माचे स्वागत करतानाच गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानानंतर कायद्याच्या कठोर अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात पीसीएनडीटी सेल जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत निर्माण केला असून जिल्ह्यात तसेच शहरात नोंदणीकृत झालेल्या सर्व सोनोग्राफी केंद्राची दर तीन महिन्यांमध्ये तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कुर्वे यांनी सांगितले.
पीसीएनडीटी या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र वेबसाईट तयार करण्यात आली असून यासंदर्भात जनतेच्या तक्रारी आॅनलाईन पद्धतीने तसेच १८२०२३३४४४५ या टोल फ्री क्रमांकावरील हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. संशयास्पद सोनोग्राफी केंद्रांची माहिती देणाऱ्या व्यक्तीकरिता २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच या माहितीच्या आधारे संबंधित केंद्रावर धाड घालून न्यायालयात फौजदारी केस दाखल केल्यानंतर माहिती देणाऱ्यांना बक्षीस देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी ६६६.ेंूँ्रे४’ॅ्र.ॅङ्म५.्रल्ल या संकेतस्थळावर नागरिकांना तक्रार नोंदविता येईल.
जिल्ह्यात जन्माच्या वेळी मुलामुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९४६ असून मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे व कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी समाजजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे म्हणाले की, शहरात ५३७ सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी झाली असून जिल्ह्यात ८९ केंद्रे नोंदणीकृत आहेत. ग्रामीण भागात ५९ केंद्रे कार्यरत आहेत. जिल्ह्यात १३ तालुक्याच्या ठिकाणी ११ ठिकाणी सोनोग्राफी केंद्रे असून दर तीन महिन्याअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सकाच्या मार्गदर्शनाखाली कडक तपासणी करण्यात येते. जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी केंद्रातील मशिनला युनिक आयडी ओळख क्रमांक देण्यात आला आहे.(प्रतिनिधी)