एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:58 IST2018-10-20T23:56:54+5:302018-10-20T23:58:24+5:30
अन्न सुरक्षा अधिनियमानुसार प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (एक कुटुंब) ३५ किलो धान्य, साखर, गोडेतेल, डाळ व एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन देऊन अन्नधान्य वितरण विभागाने १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकात शिथिलता आणावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रकाश गजभिये यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांना रविभवन येथे भेटून निवेदनाद्वारे केली.

एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अन्न सुरक्षा अधिनियमानुसार प्रती व्यक्ती ५ किलो धान्य (एक कुटुंब) ३५ किलो धान्य, साखर, गोडेतेल, डाळ व एक सिलेंडर धारकांना चार लिटर केरोसीन देऊन अन्नधान्य वितरण विभागाने १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकात शिथिलता आणावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. प्रकाश गजभिये यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांना रविभवन येथे भेटून निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात बी.पी.एल.,ए.पी.एल.व अंत्योदय कार्ड धारकांना दरमहा १० लिटर केरोसिन वितरित केले जात होते तर एक सिलेंडरधारकांना सुद्धा चार लिटर केरोसीन देण्यात येत होते. मात्र २०१४ साली भाजप-शिवसेना सरकार आल्यावर हे बंद करण्यात आले, हा राज्यातील जनतेवर घोर अन्यायच आहे. गोरगरीब जनता घरचे सिलेंडर संपल्यावर केरोसिनचा उपयोग सुध्दा करतात, मात्र १ आॅगस्ट २०१८ च्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने बी.पी.एल.,ए.पी.एल.व अंत्योदय कार्ड धारकांकडून त्यांच्याकडे सिलेंडर नसल्याचे लिखित हमीपत्र भरून घेण्याची मोहीम राबविण्यात आली. ते हमीपत्र केरोसीन परवानाधारकांनी भरून घ्यावयाचे आहे. हा एकप्रकारे गोरगरीब जनतेवर आणि केरोसीन परवानाधारकांवर अन्यायच आहे. शासनाच्या परिपत्रकात केरोसीन परवानाधारकाने हमीपत्राची कामे करावी,असे कुठेच नमुद नाही, मात्र पुरवठा अधिकारी कार्डधारकांकडून गॅस सिलेंडर नसणेबाबत हमीपत्र भरून घेण्याचे काम करण्याकरिता केरोसीन परवानाधारकांवर प्रचंड दबाव टाकत असल्याकडे गजभिये यांनी बापट यांचे लक्ष वेधले.
नागपूर शहरातील सर्व केरोसीन परवानाधारक व हॉकर्स यांना पुरवठा विभागाने सप्टेंबर २०१८ या महिन्यापासून अजूनपर्यंत केरोसीनचा कोटा वाटपाकरिता दिलेला नसल्याने नागपूरकरांना केरोसीनपासून वंचित रहावे लागत आहे.
यावेळी अल्पसंख्याक प्रदेश महासचिव शोएब असद, सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, संजय पाटील, विजय गजभिये, अजय चौरे , सुधाकर जिचकार, मिलिंद सोनटक्के, मोहम्मद सलीम, रत्नमाला मेश्राम, लक्ष्मी शिंगाडे, पार्वता लोखंडे, आशा अंडरसहारे, श्रीधर खापर्डे, कपिल सोमकुंवर, नितेश वंजारी, पराग बोरकर, पुरूषोत्तम बडगे, बाळू बिहारे, रितेश अग्रवाल, अशोक मेश्राम, राजू मेश्राम, अरूण तिडके,सुरेश चव्हाण, रामभाऊ डोंगरे, राजेश गावळी, सतीश वासनिक, देवराव जांभुलकर, विजय इंगळे, कृष्णा राऊत, भगवान पाटील, कविता पाटील, बबलू वानखेडे, कपिल सोनकुसरे, आनंद नारनवरे, हेमंत गावंडे आदी उपस्थित होते.