पावसाचा फटका : जि.प. कृ षी सभापती यांची मागणी नागपूर : गेल्या वर्षी अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला. या आपत्तीतून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. यंदाच्या खरीप हंगामात अपुरा पाऊ स झाल्याने पिकावर परिणाम झाला. त्यातच या आठवड्यात अवकाळी पावसामुळे रामटेक तालुक्यातील धानपिकाचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. नुकसानग्रस्त धान उत्पादकांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती आशा गायकवाड यांनी केली आहे.रामटेक तालुक्यातील मनसर, पडगोवरी, शिवनी, भंडारबोडी, काचूरवाही, नगरधन, शीतलवाडी, किरणापूर आदी गावांतील धानपिकाचे पावसामुळे नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची गायकवाड यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचा महसूल व कृषी विभागाने सर्वे करून सरकारने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून केल्याची माहिती गायकवाड यांनी मंगळवारी दिली. पाहणी दौऱ्यात गायकवाड यांच्यासमवेत माजी सभापती वर्षा धोपटे, जि.प. सदस्य शोभा झाडे, रामटेक पंचायत समितीच्या सभापती किरण धुर्वे, अरुण बन्सोड, पंचायत समिती सदस्य विवेक तुरक, सुरेश गायकवाड, विकेंद्र महाजन आदी सहभागी झाले होते. गायकवाड यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (प्रतिनिधी)कापसाला ६००० रु. भाव द्याकापूस उत्पादक नैसर्गिक संकटात सापडला आहे. त्यातच केंद्र सरकारने जाहीर केलेले हमीभाव कमी आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने सरकारने कापसाला प्रति क्विंटल ६००० रु.चा भाव द्यावा, अशी मागणी आशा गायकवाड यांनी केली आहे.
नुकसानग्रस्त धान उत्पादकांना आर्थिक मदत द्या
By admin | Updated: November 19, 2014 00:45 IST