शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

व्यवसाय द्या, नाहीतर चालते व्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 9:32 PM

शहरातील बेरोजगारांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून कर्जबाजारी करणाऱ्या ओला-उबेरच्या विरोधात चालकांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. चालकांनी हजारोंच्या जवळपास वाहने रेशीमबाग मैदानात दिवसभर उभी ठेवून बंद यशस्वी केला. या टॅक्सीचालकांना कंपन्यांकडून व्यवसाय मिळत नसल्यामुळे कर्ज फेडणे, घर चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यवसाय द्या नाहीतर चालते व्हा, असा नारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात चालकांनी दिला.

ठळक मुद्देओला-उबेरचा रेशीमबागेत ‘जाम’ : चालकांनी केले काम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील बेरोजगारांना लाखो रुपये महिन्याचे आमिष दाखवून कर्जबाजारी करणाऱ्या ओला-उबेरच्या विरोधात चालकांनी सोमवारी काम बंद आंदोलन पुकारले होते. चालकांनी हजारोंच्या जवळपास वाहने रेशीमबाग मैदानात दिवसभर उभी ठेवून बंद यशस्वी केला. या टॅक्सीचालकांना कंपन्यांकडून व्यवसाय मिळत नसल्यामुळे कर्ज फेडणे, घर चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे व्यवसाय द्या नाहीतर चालते व्हा, असा नारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात चालकांनी दिला.मोबाईलवर प्रवासी सेवा देणारी ओला-उबेर कंपनीची सेवा शहरात अल्पावधीतच लोकप्रिय झाली. कंपनीने सुरुवातीला बेरोजगार युवकांना लाखो रुपयांचे आमिष दाखविले. त्यामुळे बेरोजगारांनी कर्जबाजारी होऊन स्वत:ची वाहने खरेदी केली. परंतु आज कंपन्यांकडून या टॅक्सीचालकांना अपेक्षित व्यवसाय दिला जात नाही. गेल्यावर्षी तर ओला कंपनीने स्वत:ची टॅक्सी रस्त्यावर उतरविली, त्यामुळे सर्व व्यवसाय कंपनी स्वत:च्या टॅक्सीचालकांना देत आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने या सेवेत कार्यरत असलेल्या टॅक्सीचालकांवर अन्याय होत आहे. कमाई कमी झाल्यामुळे कजार्चे हप्ते भरणे कठीण व्हायला लागले़ त्याच कारणाने दहा दिवसापूर्वी चालक-मालक कॅबचालकांनी ओला व उबेरच्या प्रशासनाविरोधात इशारा आंदोलन पुकारले होते़ त्यानंतर संबंधित प्रशासनाने सकारात्मक दृष्टिकोन दाखवत योग्य तो निर्णय लवकर घेऊ, असे आश्वासन दिले़ मात्र, ते आश्वासन अद्याप पूर्ण झाले नसल्याने, सोमवारी ओला कॅब चालक-मालकांनी काम बंद आंदोलन पुकारले़ यात शेकडो चालक सहभागी झाले़ दरम्यान जे वाहक आंदोलनात सहभागी झाले नाही, त्यांना रस्त्यावरच अडवण्यात आले़ शिवाय, ओलाच्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही करण्यात आल्या़ मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले होते. या टॅक्सी कंपन्यांनी या आंदोलनाची दखल न घेतल्यास, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गडकरी यांनी दिला. आंदोलनात मनसे शहर सचिव घनश्याम निखाडे, चंदू लाडे, विशाल बडगे, अजय ढोके, श्याम पुनियानी, घनश्याम निखाडे, सांगिता सोनटक्के, मनीषा पापडकर, उमेश उतखेडे, उमेश बोरकर, प्रशांत निकम, कपिल आवारे आदी सहभागी झाले होते.चालकच हवा मालकया कंपन्या शहरात सेवा पुरविण्यासाठी आल्या आहेत. यातून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवकांना रोजगार मिळाला आहे. परंतु काही धनाड्यांनी यात स्वत:च्या पाच-पाच गाड्या लावल्या आहेत. चालक नियुक्त करून नफा कमवित आहे. अशांची वाहने काढून चालकच गाडीचा मालक असावा, अशीही मागणी टॅक्सीचालकांची आहे. शिवाय सेवा पुरविणाऱ्या  या कंपन्या असून, स्वत:ची वाहने या व्यवसायात उतरवित आहे. त्यामुळे शासनाने या कंपन्यांवर अंकुश ठेवावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

टॅग्स :Olaओलाagitationआंदोलन