गीतांजली एक्सप्रेसचं इंजिन बंद, कळमना परिसरात ट्रेन खोळंबली; प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2022 23:26 IST2022-08-22T23:26:02+5:302022-08-22T23:26:17+5:30

गीतांजली एक्सप्रेस नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री ७.१५ वाजता नागपुर स्थानकावरून गोंदियाच्या दिशेने निघाली.

Gitanjali Express engine shut down, train derailed in Kalmana area; Passenger inconvenience | गीतांजली एक्सप्रेसचं इंजिन बंद, कळमना परिसरात ट्रेन खोळंबली; प्रवाशांची गैरसोय

गीतांजली एक्सप्रेसचं इंजिन बंद, कळमना परिसरात ट्रेन खोळंबली; प्रवाशांची गैरसोय

नरेश डोंगरे

नागपूर : गोंदियाकडे निघालेल्या गीतांजली एक्सप्रेसचे इंजिन फेल झाल्यामुळे ही गाडी कळमना परिसरात अडकली. दरम्यान, बराच वेळ होऊनही गाडी पुढे निघाली नाही. यामुळे प्रवाशांची तीव्र गैरसोय झाली.

गीतांजली एक्सप्रेस नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री ७.१५ वाजता नागपुर स्थानकावरून गोंदियाच्या दिशेने निघाली. मात्र, काही अंतर पुढे जाताच कळमना परिसरात या रेल्वे गाडीचे इंजिन फेल झाले. बराच वेळ प्रयत्न करूनही इंजिन सुरू होत नसल्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या अन्य रेल्वे गाड्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला. दरम्यान, इंजिन सुरू होत नसल्याचे पाहून ही रेल्वे गाडी लुप लाईनवर टाकण्यात आली. दुसऱ्या इंजिनची व्यवस्था होईपर्यंत दोन-तीन तासाचा अवधी निघून गेला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला.

Web Title: Gitanjali Express engine shut down, train derailed in Kalmana area; Passenger inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.