गर्ल्स शायनिंग
By Admin | Updated: June 4, 2017 01:29 IST2017-06-04T01:29:10+5:302017-06-04T01:29:10+5:30
‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले.

गर्ल्स शायनिंग
‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांचे ‘सेलिब्रेशन’ : ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १०
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ स्कूल एज्युकेशन) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल शनिवारी दुपारी घोषित करण्यात आले. निकालांमध्ये यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे. उपराजधानीत ‘सीबीएसई’च्या सुमारे ५० शाळा असून, यातील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. सुरुवातीला गुणांऐवजी ‘ग्रेड’वर आधारित निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे निकाल पाहताना पालक व विद्यार्थ्यांसोबतच शाळांमध्येदेखील संभ्रम निर्माण झाला होता. परंतु काही तासांनी शाळांकडे विद्यार्थ्यांचे गुण आल्यानंतर चित्र स्पष्ट झाले. आश्चर्याची बाब म्हणजे ६०० हून अधिक विद्यार्थ्यांचा ‘सीजीपीए’ १० इतका आहे.
‘नारायणा विद्यालयम्’च्या ईशान प्रयागी व नंदिनी चलाख यांनी ९९.४ टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर बाजी मारली असून, गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स)ची विद्यार्थिनी कनक गजभिये व बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर) येथील विद्यार्थिनी आयुषी आंबिलकर यांनी ९९.२ टक्के (४९६) गुण प्राप्त करीत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकावर ‘नारायणा विद्यालयम्’चे ऋतुजा कोलते, शिवानी पाटील, बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स)ची ऋषिका जोशी व ‘मॉडर्न स्कूल’ (कोराडी रोड) येथील अनंत सोहल हे चौघे आहेत. या चौघांनाही प्रत्येकी ९९ टक्के (४९५) गुण प्राप्त झाले.
नागपुरातील ‘टॉपर्स’
क्रमांकनावशाळाटक्के
१ईशान प्रयागीनारायणा विद्यालयम्९९.४० %
१नंदिनी चलाखनारायणा विद्यालयम्९९.४० %
२कनक गजभियेभवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९९.२० %
२आयुषी आंबिलकरभवन्स विद्यामंदिर, श्रीकृष्णनगर९९.२० %
३ऋतुजा कोलतेनारायणा विद्यालयम्९९ %
३शिवानी पाटीलनारायणा विद्यालयम्९९ %
३ऋषिका जोशीभवन्स विद्यामंदिर, सिव्हिल लाईन्स९९ %
३अनंत सोहलमॉडर्न स्कूल, कोराडी रोड९९ %
विद्यार्थ्यांची धावपळ
नागपुरातील सीबीएसई शाळा चेन्नई विभागाच्या अंतर्गत येत असल्याने निकालाची माहिती मिळताच विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली. निकालाची माहिती समजताच विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमध्ये विचारपूस करण्यास सुरुवात केली . मोबाईलवर एसएमएसने निकाल पाहण्याची सुविधा नसल्याने अनेकांनी तर ‘इंटरनेट’ वर पाहण्याचा प्रयत्न केला तर बाहेरगावी असलेल्यांनी इतर मित्रांकडून निकाल काय हे माहीत करून घ्यायचा प्रयत्न केला. ‘सीबीएसई’चे संकेतस्थळ बराच वेळ संथ सुरू होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुण कळत नव्हते.
‘सीजीपीए’मध्ये विद्यार्थिनींचीच बाजी
नागपुरातील ‘सीबीएसई’च्या बहुतेक सर्व शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे १० ‘सीजीपीए’ म्हणजेच सर्वोत्तम ‘ग्रेड’ असलेल्यांमध्ये विद्यार्थिनींचे प्रमाण जास्त आहे.