गर्ल्स रॉ क
By Admin | Updated: May 26, 2015 02:23 IST2015-05-26T02:23:15+5:302015-05-26T02:23:15+5:30
‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील

गर्ल्स रॉ क
सीबीएसई बारावी निकाल : वाणिज्यचे अच्छे दिन
नागपूर : ‘सीबीएसई’तर्फे (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात यंदादेखील विद्यार्थिनींनीच बाजी मारल्याचे चित्र आहे. विज्ञान, वाणिज्य आणि मानव्यशास्त्र या तिन्ही अभ्यासक्रमांत मुलींनीच अव्वल क्रमांक पटकाविला आहे. विशेष म्हणजे गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदादेखील वाणिज्य शाखेतील विद्यार्थीच ‘टॉप’ ठरले आहेत.
बारावी ‘सीबीएसई’च्या परीक्षेला शहरातील २० शाळांमधून सुमारे १७५० विद्यार्थी बसले होते. जवळपास २०० विद्यार्थ्यांना ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण आहेत. यात विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त असल्याची माहिती शाळांतर्फे देण्यात आली आहे. सामान्यत: विज्ञान विषयात जास्त गुण मिळतात, असा समज आहे. परंतु मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदादेखील निकालांत वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून शहरातून अव्वल स्थान पटकाविले. ‘मेट्रो’ शहरांप्रमाणे नागपुरातदेखील वाणिज्य शाखेला मागणी वाढत असून अनेक गुणवंत विद्यार्थी इकडे वळत आहेत. येणाऱ्या काळात वाणिज्य शाखेवर विद्यार्थ्यांचा जास्त भर नक्कीच दिसून येईल, असा विश्वास अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी बोलून दाखविला. -विशेष/२
संथ संकेतस्थळामुळे शाळांची अडचण
दुपारी १२ च्या सुमारास ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी एकच गर्दी केली. देशभरातून निकाल पाहण्यात येत असल्याने संकेतस्थळ अतिशय संथ झाले होते. शाळांमधील शिक्षकांना एकेका विद्यार्थ्याचा निकाल काढताना नाकीनऊ येत होते. संपूर्ण निकाल काढण्यासाठी शाळांना सुमारे साडेतीन ते चार तासांचा अवधी लागला. ‘सीबीएसई’चे संकेतस्थळ नेहमीच निकालांच्या वेळी संथ होते, अशी शिक्षकांची तक्रार होती.