प्रियकराच्या धोकेबाजीमुळे तरुणीची आत्महत्या
By Admin | Updated: March 22, 2015 02:30 IST2015-03-22T02:30:53+5:302015-03-22T02:30:53+5:30
प्रियकराच्या धोकेबाजीमुळे व्यथित झालेल्या एका तरुणीने तलावात आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला तिचा प्रियकरच कारणीभूत ...

प्रियकराच्या धोकेबाजीमुळे तरुणीची आत्महत्या
नागपूर : प्रियकराच्या धोकेबाजीमुळे व्यथित झालेल्या एका तरुणीने तलावात आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येला तिचा प्रियकरच कारणीभूत असल्याची बाब तब्बल तीन महिन्यानंतर उघड झाली. त्यामुळे अंबाझरी पोलिसांनी शनिवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. विनोद भगवान घेवंदे (वय २६) असे आरोपीचे नाव असून, तो राज्य राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे. वैशाली हरिनाथ धवराड (वय २४, रा. भारसिंगी, नरखेड) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती शिकण्यासाठी आपल्या बहिणीकडे आली होती. आरोपी विनोद वैशालीच्या नात्यातच आहे. त्यामुळे त्यांच्यात ओळखी होती. त्याचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाचे आमिष दाखवून विनोद २०१२ पासून वैशालीवर पत्नीसारखा हक्क दाखवायचा. तब्बल तीन वर्षे त्यांचे प्रकरण सुरू होते. नंतर मात्र त्याने वैशालीला अंधारात ठेवून दुसऱ्या तरुणीशी लग्न जुळविले. त्याला याबाबत विचारणा केली. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. त्याच अवस्थेत तिने २४ डिसेंबरला अंबाझरी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. वैशालीची बहीण अनिता राहुल इंगळे यांच्या तक्रारीवरून ठाणेदार अनिल कातकाडे यांनी विनोदविरुद्ध गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)