मुलीला पळवून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:29 IST2020-11-22T09:29:23+5:302020-11-22T09:29:23+5:30

-- - दोघांनी लावला गळफास नागपूर - नंदनवन आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवनमधील ...

The girl was abducted | मुलीला पळवून नेले

मुलीला पळवून नेले

---

दोघांनी लावला गळफास

नागपूर - नंदनवन आणि पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली.

नंदनवनमधील एम. जी. कॉलनीत राहणारा सागर प्रभाकर शिंदे (वय २९)या तरुणाने शुक्रवारी सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. प्रवीण हेमराज गिरे (वय ३३) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

अशाच प्रकारे पाचपावलीतील महादेवनगरात राहणारे धम्मशिल प्रेमनाथ कांबळे (वय ३५) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. कांबळे मुळचे हिंगणघाट (जि. वर्धा) येथील रहिवासी होते. शनिवारी पहाटे २ च्या सुमारास ही घटना लक्षात आली.कमलचंद महिपाल नगराळे (वय ३८)यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: The girl was abducted