शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘यू-ट्यूब’वर व्हिडीओ पाहून मुलीने घेतला गळफास, नागपुरातील हृदयदावक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 04:17 IST

यू-ट्यूबवर दोन मुली गळपास घेत असल्याचा व्हिडीओ तिने पाहिला. यापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता.

नागपूर : लहान मुलांसाठी स्मार्टफोन आता जीवघेणा ठरू लागला आहे. हंसापुरी भागातील १२ वर्षांच्या मुलीने यू-ट्यूबवर गळफास घेण्याचा व्हिडीओ पाहून स्वत: पट्ट्याने गळफास घेतला, त्यात तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली.शिखा विनोद राठोड ही सहावीत शिकत होती. शनिवारी शाळेतून आल्यावर ती लहान बहिणीसोबत मोबाईलवर खेळू लागली. यानंतर यू-ट्यूबवर दोन मुली गळपास घेत असल्याचा व्हिडीओ तिने पाहिला. यापूर्वीही तिने हा व्हिडीओ अनेकदा पाहिला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिच्या या कृत्याला फारसे गांभीर्याने घेतले नाही. तिने आपल्या आईलाही या व्हिडीओबाबत सांगितले होते. आईने तेव्हा तिला असे व्हिडीओ न पाहण्याबाबत ताकीद दिली होती.सायंकाळी शिखा आपल्या खोलीत लहान बहिणीसोबत पुन्हा तो व्हिडीओ पाहत होती. शिखाने व्हिडीओ पाहून आपला पट्टा पंख्याला बांधला. ती व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे करू लागली. ती ज्या स्टुलवर उभी होती, तो खाली पडला आणि पट्ट्याचा तिच्या गळ््याला फास बसला. ती ओरडू लागली. लहान बहिणीने स्वयंपाकघरात असलेल्या आईला बोलावून आणले. आईने बेशुद्धावस्थेतील शिखाला खाली उतरवले. तिला रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.मुलांमध्ये मोबाईलची सवय धोकादायकमानसोपचार तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाईलवर व्हिडिओ पाहण्याचे व्यसन मुलांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पालकांना त्यांची मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.

टॅग्स :nagpurनागपूर