विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:11 IST2021-08-13T04:11:55+5:302021-08-13T04:11:55+5:30

कळमेश्वर : टीव्ही सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील झुनकी ...

Girl dies of electric shock | विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने मुलीचा मृत्यू

कळमेश्वर : टीव्ही सुरू करताना विजेचा धक्का लागल्याने मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील झुनकी येथे बुधवारी (दि. ११) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

उन्नती प्रकाश खेडकर (वय ११, रा. झुनकी सावळी, ता. कळमेश्वर) असे मृत मुलीचे नाव आहे. उन्नती हिने घरी हाॅलमध्ये टीव्ही सुरू करण्यासाठी बटण दाबले असता, तिच्या उजव्या हाताला विजेचा धक्का लागल्याने ती बेशुद्ध पडली. लगेच तिला कळमेश्वर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तपासणीअंती डाॅक्टरांनी तिला मृत घाेषित केले. या प्रकरणी प्रकाश मधुकर खेडकर (४३, रा. झुनकी सावळी, ता. कळमेश्वर) यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, पुढील तपास पाेलीस हवालदार जिचकार करीत आहेत.

Web Title: Girl dies of electric shock