अंगावर गरम पाणी पडून मुलीचा मृत्यू 

By योगेश पांडे | Published: April 23, 2023 02:26 PM2023-04-23T14:26:42+5:302023-04-23T14:27:02+5:30

१५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आंघोळीला जात असताना आस्थाच्या अंगावर गरम पाणी पडले.

Girl dies after hot water falls on her body | अंगावर गरम पाणी पडून मुलीचा मृत्यू 

अंगावर गरम पाणी पडून मुलीचा मृत्यू 

googlenewsNext

नागपूर : आंघोळीला जात असताना अंगावर गरम पाणी पडून एका सतरा वर्षे मुलीचा मृत्यू झाला. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आस्था प्रकाश बैसवारे ( १७, टी. बी.वॉर्ड) असे मृतक मुलीचे नाव आहे.

१५ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास आंघोळीला जात असताना आस्थाच्या अंगावर गरम पाणी पडले. त्यात ती जखमी झाली. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी मेडीकल इस्पितळात दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी दुपारी दीड वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.  ईमामवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Girl dies after hot water falls on her body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर