मंगसा येथील जिनिंगला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:34+5:302021-03-04T04:11:34+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : कन्व्हेअर बेल्टवर कापूस चढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लाॅक लाेडरच्या बॅटरीमध्ये स्पार्किंग झाले आणि त्यातील ठिणगीमुळे ...

Ginning fire at Mangsa | मंगसा येथील जिनिंगला आग

मंगसा येथील जिनिंगला आग

लाेकमत न्यूज नेटवर्क

सावनेर : कन्व्हेअर बेल्टवर कापूस चढविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्लाॅक लाेडरच्या बॅटरीमध्ये स्पार्किंग झाले आणि त्यातील ठिणगीमुळे जिनिंगच्या आवारातील कापसाने पेट घेतला. ही आग पसरत गेल्याने आवारातील अंदाजे सहा ते सात हजार क्विंटल कापूस आणि तीन ते चार हजार क्विंटल सरकी भस्म झाली. जळालेल्या कापसाची किंमत ४ काेटी ५० हजार रुपये तसेच सरकीची किंमत १ काेटी ५० लाख रुपये असल्याची माहिती मनीष भैस्वार यांनी दिली. ही घटना मंगसा (ता. सावनेर) येथे मंगळवारी (दि. २) सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली असून, रात्री १०.३० वाजेपर्यंत नियंत्रणात आली हाेती.

राजेश भैस्वार, राजू सावंत व अरुण सिंघानिया या तिघांची भागीदारी मंगसा (ता. सावनेर) शिवारात विजयलक्ष्मी काॅटन जिनिंग नामक जिनिंग प्रेसिंग आहे. या जिनिंगच्या आवारात शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस ठेवला हाेता. हा कापूस कन्व्हेअर बेल्टद्वारे जिन करण्यासाठी मशीनमध्ये जाताे. कापसाला कन्व्हेअर बेल्टवर ठेवण्यासाठी ब्लाॅक लाेडरचा वापर केला जाताे. मंगळवारी सायंकाळी याब्लाॅक लाेडरच्या बॅटरीमध्ये स्पार्किंग झाले आणि त्यातील ठिगणीमुळे जवळच्या कापसाचे पेट घेतला.

क्षणार्धात ही आग पसरत गेली. त्यामुळे जिनिंगच्या आवारात ठेवलेला सहा ते सात हजार क्विंटल कापूस आणि शेडमध्ये असलेली तीन ते चार हजार क्विंटल सरकी पूर्णपणे जळाली. आग लागल्याचे लक्षात येताच साैंसर (जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश) येथून तीन तर सावनेर नगर पालिकच्या दाेन अशा एकूण पाच अग्निशमन दलाच्या गाड्या बाेलावण्यात आल्या हाेत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तास अथक प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु, ही आग पूर्णपणे विझली नव्हती. या आगीत एकूण सहा काेटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती राजेश भैस्वार यांचे भाऊ मनीष भैस्वार यांनी दिली.

...

रुईच्या गाठी व मशीन सुरक्षित

ही आग जिनिंगच्या आवारापुरतीच मर्यादित ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. त्यामुळे ती रुईचे गाेडाऊन आणि कापूस जिनिंग मशीनर्यंत पाेहाेचली नाही. परिणामी, या जिनिंगमधील मशीन व गाेडाऊनमधील रुईच्या गाठी सुरक्षित राहिल्या, अशी माहिती मनीष भैस्वार यांनी दिली. आग लागताच कामगार सुरक्षित ठिकाणी गेल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. त्यामुळे या आगीत प्राणहानी झाली नाही.

Web Title: Ginning fire at Mangsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.