शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस; पृथ्वीवरील नरकाचाच अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 07:00 IST

Nagpur News एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे ‘महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित ठिकाण’ असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देप्रदूषणामुळे स्थानिक अनेक आजारांच्या विळख्यात सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष

आशिष राॅय

नागपूर : एनर्जी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (टेरी)च्या २०१८-१९च्या अहवालानुसार चंद्रपूरजवळील घुग्गुस हे ‘महाराष्ट्रातील सर्वांत प्रदूषित ठिकाण’ असल्याचे आढळून आले आहे. येथील वातावरणात धुलीकणांची (आरएसपीएम) पातळी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे निर्धारीत मर्यादेच्या तिपटीवर पाेहोचली असून वायू प्रदूषणामुळे लाेक माशांसारखे मरत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना उपाययोजनांबाबत सरकार उदासीन आहे आणि जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी)चे अधिकारी गाढ झोपेत आहेत.

टेरीच्या अहवालानुसार २०१८-१९मध्ये धुलीकणांचा स्तर १७५ म्युग्रॅम् / घनमीटर एवढे हाेते. २०१७ - १८ साली ते २९८ म्युग्रॅम / घनमीटरपर्यंत वाढले हाेते. आरएसपीएमच्या उच्चपातळीमुळे घुग्गुसचे रहिवासी हृदयविकाराच्या धक्क्याने मरत आहेत. बहुतेकांना किडनी, स्तन, फुफ्फुस, हृदय, डोळे आणि त्वचेच्या आजारांनी ग्रासले असल्याचे घुग्गुसचे डॉ. प्रदीप यादव यांनी सांगितले.

आम आदमी पक्षाचे (आप) नेते अमित बोरकर यांनी सांगितले, घुग्गुसमध्ये स्पंज आयर्न, सिमेंट आणि कोळशाचा घातक संयोग आहे. लॉयड्स मेटलचा स्पंज आयर्न प्लँट, एसीसीचा सिमेंट प्लँट आणि डब्ल्यूसीएलच्या कोळशाच्या खाणी शहराजवळ आहेत. स्पंज आयर्न प्लँट्स हे सर्वांत प्रदूषित उद्योगांपैकी एक असून, अनेक देश आणि भारतीय राज्यांनी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. घुग्गुसमध्ये मात्र हे उद्याेग हवेत मुक्तपणे विष टाकत आहेत.

पर्यावरण कार्यकर्ते विनेश कलवाल यांनी सांगितले, लॉयड्स प्लँटमधून लोहाचे बारीक कण हवेत उत्सर्जित हाेतात व मानवी फुफ्फुसात स्थिरावत रक्तप्रवाहात प्रवेश करतात. घुग्गुसमधील प्रत्येक तिसऱ्या घरात कर्करोगाचा रुग्ण असून, लवकरच प्रत्येक घरात एक रुग्ण असेल. कलवाल म्हणाले, स्थानिकांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि एमपीसीबीकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत; पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. सरकारी अधिकारी आणि स्थानिक राजकारणी उद्योगपतींशी हातमिळवणी करून लाेकांच्या आराेग्याशी खेळत आहेत. दरम्यान, कलवाल आणि आपच्या कार्यकर्त्यांच्या सक्रियतेने लॉयड्सला १००० काेटींची विस्तार योजना थांबविण्यास भाग पाडले.

ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष व पर्यावरणतज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी घुग्गुसच्या उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणाची योग्य उपकरणे बसवली नसल्याचा आरोप केला आहे. घुग्गुससाठी वायू प्रदूषण नियंत्रण आराखडा सरकारने त्वरित तयार करायला हवा. एमपीसीबीचे प्रादेशिक अधिकारी ए. एम. करे यांनी लॉयड्स प्लँटची पाहणी करण्यासाठी सोमवारी एका अधिकाऱ्याला पाठवून आवश्यक ती कारवाई करण्याचा ‘शब्द’ दिला.

 

टॅग्स :pollutionप्रदूषण