गोरेवाडा प्रकल्प उद्घाटनात निमंत्रितांच्या परवानगीवरून घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:25+5:302021-02-05T04:59:25+5:30

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यानाच्या नामकरण आणि इंडियन सफारीच्या उद्घाटन समारंभात नेमक्या किती व्यक्तींना निमंत्रित करायचे, यावरून पोलीस ...

Gholwada project inauguration with the permission of the invitees | गोरेवाडा प्रकल्प उद्घाटनात निमंत्रितांच्या परवानगीवरून घोळ

गोरेवाडा प्रकल्प उद्घाटनात निमंत्रितांच्या परवानगीवरून घोळ

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय उद्यानाच्या नामकरण आणि इंडियन सफारीच्या उद्घाटन समारंभात नेमक्या किती व्यक्तींना निमंत्रित करायचे, यावरून पोलीस विभाग आणि गोरेवाडा प्रशासनात घोळ सुरू आहे.

कोरोनाचे कारण देऊन हा समारंभ अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावा, अशा सूचना आहे. त्यासाठी आरोग्यविषयक सर्व ती खबरदारी घेतली जावी, अशीही सूचना आहे. प्रारंभी या समारंभाला पाहुणे वगळता ५० व्यक्तींनाच निमंत्रित करण्याचे ठरले होते. मात्र लोकप्रतिनिधी, सन्माननीय व्यक्तींची यादी बरीच मोठी असल्याने ही संख्या वाढविण्यासंदर्भात पोलीस विभागाकडे विनंती करण्यात आली होती. त्यांतर १०० व्यक्तींनाच निमंत्रित करावे, असे ठरले. छायाचित्रकार, माध्यमांच्या प्रतिनिधींची आणि अधिकाऱ्यांची संख्याही यात गृहीत धरली जावी, असेही सांगण्यात आले. खुद्द मुख्यमंत्री सचिवालयातूनच अशा सूचना असल्याचे कारणही त्यासाठी सांगितले जात आहे. यामुळे गोरेवाडा प्रशासन पेचात पडले आहे. परिणामत: समारंभ एक दिवसावर येऊन ठेपला तरी अद्याप निमंत्रितांच्या तसेच पत्रकारांच्या सुरक्षा पासेसचे नियोजन झालेले नाही. पत्रिकाही पोहोचलेल्या नाहीत.

Web Title: Gholwada project inauguration with the permission of the invitees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.