नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. जैन सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष, संजीवनी ब्लड डोनर्स असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष घनश्याम मोहनलाल मेहता यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ६५ वर्षाचे होते. त्यांच्या इच्छेनुसार अवयवदान करण्यात आले. अंत्ययात्रा शनिवारी दयालु मौर्य अपार्टमेंट, नवीन आरटीओ ऑफिसजवळ, चिखली चौक, कळमना येथून निघुन गंगाबाई घाटावर जाईल. त्यांच्यापश्चात पत्नी इंदिरा, मुलगा श्रेणिक, सौरभ आहे. घनश्याम मेहता यांचे धार्मिक सामाजिक संस्थांसोबत जवळचे संबंध होते. त्यांनी १०० हून अधिक वेळा रक्तदान केले. ४०० हून अधिक रक्तदान शिबिराचे आयोजन केले. अपेक्षा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून १२० हून अधिक निराधार व अनाथ मुलींचे कन्यादान केले. सामाजिक कार्याबद्दल त्यांना अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
घनश्याम मेहता यांचे निधन ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:23 IST