काेराेना संपवायचा असेल तर लसीकरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:11 IST2021-04-30T04:11:18+5:302021-04-30T04:11:18+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : काेराेनाचा प्रकाेप दिवसेंदिवस वाढत आहे. अशास्थितीत काेराेनाला संपवायचे असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, ...

काेराेना संपवायचा असेल तर लसीकरण करा
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : काेराेनाचा प्रकाेप दिवसेंदिवस वाढत आहे. अशास्थितीत काेराेनाला संपवायचे असेल तर लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही, त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करावे, असे आवाहन सुराबर्डीचे सरपंच ईश्वर गणवीर यांनी केले.
सुराबर्डी गावातील प्रत्येक १८ वर्षांवरील स्त्री-पुरुषांच्या लसीकरणाबाबत गुरुवारी (दि.२९) ग्रामपंचायत येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीला नागपूर ग्रामीणचे तहसीलदार माेहन टिकले, खंडविकास अधिकारी सुभाष जाधव उपस्थित हाेते. यावेळी मंगळवार, ४ मे राेजी ग्रामपंचायत येथे लसीकरण शिबिराचे आयाेजन करण्याचे ठरले. यावेळी सरपंच ईश्वर गणवीर, उपसरपंच मुकेश महाकाळकर, सचिव मनीष रावत, वरिष्ठ लिपिक शेषराव काेहळे, तलाठी, महसूल अधिकारी, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आदींची उपस्थिती हाेती.
काेराेनावर लस हा उत्तम पर्याय आहे. लसीकरणाचे महत्त्व प्रत्येकाने १० जणांना पटवून द्यावे. ही जनचळवळ हाेईल, तेव्हाच लसीकरणाबाबत नागरिकांची वळवळ सुरू हाेईल, असे मत उपसरपंच मुकेश महाकाळकर यांनी व्यक्त केले. गावातील काेणतीही व्यक्ती काेराेनाबाधित आढळल्यास सर्व नियम पाळून उपचार करून घ्यावे, महामारीचे संकट लक्षात घेता व्यापाऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे तहसीलदार माेहन टिकले यांनी सांगितले. एखादा व्यापारी वा दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असल्यास त्यांच्या विराेधात दंडात्मक कारवाई करा, असे निर्देश खंडविकास अधिकारी सुभाष जाधव यांनी दिले.