शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एका लाखाच्या बदल्यात घ्या चार लाख, बनावट नोटांच्या रॅकेटचा भंडाफोड

By योगेश पांडे | Updated: May 30, 2024 22:14 IST

फेसबुकवरून दिली जात होती जाहिरात : महाराजबागेजवळ पोलिसांनी रंगेहाथ पकडले

नागपूर: एका लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये देण्याचे आमिष दाखवत बनावट नोटा देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींकडून फेसबुकच्या माध्यमातून हे रॅकेट संचालित करण्यात येत होते. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत महाराजबागेजवळ ही घटना घडली.

सतीश ज्ञानदेव गायकवाड (२९, वडोदा, मानकापूर, बुलढाणा), शब्बीर ऊर्फ मोनू बलाकत शेख (२७, राजीवनगर, एमआयडीसी), शुभम सहदेव पठाण (२७, आयसी चौक, गेडाम ले आऊट, एमआयडीसी) व गौतम राजू भलावी (२१, आयसी चौक, एमआयडीसी) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून फेसबुकवर एक लाखाच्या बदल्यात चार लाख रुपये घ्या, अशी जाहिरात करण्यात आली होती. २९ मे रोजी राहुल वासुदेव ठाकूर (३१, सुशीलनगर, झिंगाबाई टाकळी) याला मोबाइलवर संबंधित जाहिरात दिसली. त्याने ८६०४३०६८८५ या क्रमांकावर फोन केला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव विजय राठोड असे सांगितले. त्याने एक लाख रोकड दिली तर चार लाख रुपये देऊ, असे सांगितले.

राहुल आरोपीच्या सांगण्यावरून महाराजबागेजवळ ८० हजार रुपये घेऊन गेला. तेथे आरोपी उभा होता. राहुलने त्याला ८० हजार रुपये दाखविले. यावर आरोपीने काळ्या बॅगेत चार पट रक्कम असल्याचे सांगितले. राहुलला संशय आल्याने त्याने बॅगची पाहणी सुरू केली. हे पाहून आरोपी ८० हजार रुपये हिसकावून पळायला लागला. हे पाहून राहुलने आरडाओरड केली. आरोपी व त्याच्या चार साथीदारांनी राहुलला मारहाण केली व चाकूचा धाक दाखवत खाली पाडले. आवाज ऐकून राहुलचा मित्र व मामा तेथे पोहोचले. त्याचवेळी पोलिसदेखील गस्तीवर होते. त्यांनी चार आरोपींना ताब्यात घेतले तर एक जण फरार झाला. पोलिसांनी बॅगमधील नोटा पाहिल्या असता त्या बनावट असल्याचे आढळले. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे.

व्हॉट्सॲप कॉलवरच करायचे चर्चाआरोपींना पकडले जाण्याची भीती होती. त्यामुळे ते नेहमी जाळ्यात अडकलेल्यांशी व्हॉट्सॲप कॉलवरूनच बोलायचे. आरोपींपैकी एक असलेल्या सतीशलादेखील त्यांनी जाळ्यात अडकविले होते. परत गेलेली रक्कम मिळावी यासाठी तोदेखील या टोळीत सहभागी झाला होता.

कुठून आल्या बनावट नोटा ?या आरोपींकडून बनावट नोटांची बंडले जप्त करण्यात आली आहेत. या आरोपींकडे बनावट नोटा कुठून आल्या व त्यांची आणखी कुठे लिंक आहे याचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकारे त्यांनी किती जणांना फसविले याचीदेखील चौकशी सुरू आहे.

आरोपींकडून ४४ बनावट नोटांची बंडले जप्तआरोपींकडून पोलिसांनी बनावट नोटांची ४४ बंडले जप्त केली आहेत. यातील अनेक नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा होत्या व बंडलांमध्ये ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. आरोपींनी प्रत्येक बंडलात वरील नोट खरी लावली होती. त्यामुळे बंडल पाहिल्यावर ते खऱ्या नोटांचे वाटत होते.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर