शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो प्रकल्पाच्या पिलरचे जिओग्राफिकल टॅगिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 21:25 IST

मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे.

ठळक मुद्दे५डी-बीम प्रणालीमुळे १० ते १७ टक्के बचत : कार्याची माहिती एका क्लिकवर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या संपूर्ण कामावर देखरेखीसाठी ५ डी-बीमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रोच्या मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचे डिझाईन याद्वारे तयार करण्यात आले आहे. बिलांचा हिशेबही बीम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ठेवण्यात येत आहे.महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पात डिजिटल माध्यमाने प्रकल्पाचे कार्य निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात येत आहे. यामुळे मुख्यत्वे डीपीआरमधील मंजूर खर्चातही बचत होत आहे. प्रकल्पाचे बांधकाम करीत असताना बीआयएम तंत्रज्ञानाचा वापर केल्यास १० ते १७ टक्क्यापर्यंत बचत करता येते. प्रकल्पाचे कार्य सुरू असताना डिजिटल माध्यमाची निवड केल्याने भविष्यात संचालन आणि देखरेखीसाठी मोठी बचत महामेट्रोला होणार आहे.५ डी-बीमच्या मदतीने पूर्ण केलेल्या कार्याचा आढावा घेता येतो. सर्वप्रथम संगणकावर डिश बोर्ड ५ डी-बीमची यंत्रणा सुरू करून हव्या असलेल्या कार्याची निवड करावी लागते. उदा. मॉडेल (मेट्रो पिलर) यावर क्लिक केल्यास सर्वप्रथम सदर पिलर हा कुठल्या जागी व कुठल्या रिचमध्ये आहे याची माहिती मिळते. या पिलरमध्ये कुठल्या प्रकारचे काँक्रिट, स्टील, वापरण्यात आले आहे व त्याची क्षमता काय, याची माहिती मिळते.नागपूर मेट्रोच्या सर्व मेट्रो पिलरला जिओग्राफिकल टॅगिंग करण्यात आले असून, त्याचे लोकेशन तसेच त्या ठिकाणी कुठले गर्डर ठेवण्यात आले आहे, तसेच या पिलरच्या इतर घटकांची माहिती प्राप्त होते. हे कार्य कधी नियोजित होते आणि कधी पूर्ण झाले, याची माहिती मिळते. तसेच पुढील महिन्यात व सद्यस्थितीत काय नियोजन करण्यात आले आहे, याचीही माहिती करता येते. जर कुठल्या कार्याला उशीर होत असल्यास त्याची माहिती प्राप्त होऊन संबंधित कंत्राटदारावर दंड ठोठावता येतो. प्रत्येक महिन्यात संबंधित कंत्राटदाराने कार्य पूर्ण केले असल्यास संबंधित कंत्राटदार पेंमेंटकरिता ५ डी-बीमच्या एसएपी सॉफ्टवेअरमध्ये रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शनमध्ये पूर्ण केलेल्या कार्याची माहिती प्रदान करतो.महामेट्रोद्वारे कंत्राटदाराने रिक्वेस्ट फॉर इन्स्पेक्शनची माहिती जनरल कन्स्लटंटद्वारे तपासून केलेले कार्य योग्य असल्यास त्याला प्रमाणित करून सदर कार्याचे पेमेंट कंत्राटदाराला देण्यात येते. ५ डी-बीम प्रणालीमध्ये प्रत्येक कार्याकरिता कलर कोड ठरविण्यात आला असून, त्यामुळे कार्याची प्रगती दिसून येते.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर