शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रो करणार पॉकेट ट्रॅकचे निर्माण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 01:05 IST

तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आलेले अडथळे हटविण्यासाठी पॉकेट ट्रॅक उपयोगी ठरेल, असा महामेट्रोचा दावा आहे.

ठळक मुद्दे मेट्रो मार्गावर खोळंबा टाळण्यास मदत : सर्व रिचमध्ये उभारणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तांत्रिक बिघाडामुळे गाडी रुळावरच बंद पडल्यास त्याचा वाहतुकीवर विपरीत परिणाम न होण्यासाठी महामेट्रो नागपूर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करणार आहे. नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या चारही भागांमध्ये पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. वाहतुकीदरम्यान आलेले अडथळे हटविण्यासाठी पॉकेट ट्रॅक उपयोगी ठरेल, असा महामेट्रोचा दावा आहे.पॉकेट ट्रॅक म्हणजे काय?प्रत्येक मेट्रो प्रकल्पात अप आणि डाऊन असे दोन रेल्वे मार्ग असतात. पण याशिवाय सुमारे १०० मीटर लांबीच्या ट्रॅकचे बांधकाम ठराविक ठिकाणी करण्यात येते. त्याचा उपयोग बंद पडलेली गाडी उभी करण्याकरिता होत असल्याने या ठराविक ट्रॅकला पॉकेट ट्रॅक असे म्हणतात. सर्वसामान्यपणे मेट्रो रेल्वेकरिता टाकण्यात येणाºया रुळांचे बांधकाम सेगमेंटल गर्डरच्या माध्यमाने होते. मात्र पॉकेट ट्रॅकच्या बांधकामात आय-गर्डरचा उपयोग होतो. अप किंवा डाऊन मार्गावर बंद पडलेली मेट्रो रेल्वे बॅटरीद्वारे संचालित होणाºया पॉवर इंजिनच्या मदतीने ओढत पॉकेट ट्रॅकपर्यंत पोहोचविली जाते. मेट्रो मार्गावर वाहतूक कमी झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस तांत्रिक बिघाड झालेली गाडी दुरुस्तीसाठी डेपोला नेली जाते.रिच-१ मध्ये रहाटे कॉलनीजवळ पॉकेट ट्रॅकनागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत असलेल्या चारही मार्गिकांवर पॉकेट ट्रॅकचे बांधकाम होणार आहे. खापरी मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो स्टेशन दरम्यान असेलल्या रिच-१ भागातील रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशनजवळ पॉकेट ट्रॅकचे बांधकाम निर्माणाधीन आहे. तसेच लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते मुंजे चौक मेट्रो स्टेशनदरम्यान असेलल्या रिच-३ भागातील रचना मेट्रो स्टेशन येथे पॉकेट ट्रॅकचे बांधकाम करण्यात येत आहे. याशिवाय रिच-२ आणि रिच-४ या भागांमध्येदेखील येत्या काळात पॉकेट ट्रॅक तयार करण्यात येणार आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर