शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

महामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:41 IST

अवघ्या सव्वाचार महिन्यांच्या अल्पावधीत सेगमेंट बनविण्याचे विक्रमी कार्य मेट्रोने पूर्ण केले आहे. सेगमेंट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मेट्रोने गाठला आहे. मागील १५ महिन्यांत २२६५ सेगमेंट तयार करण्यात आले असून यापैकी १००० सेगमेंट अवघ्या १३२ दिवसात (सव्वाचार महिने) तयार करण्यात आले असून निर्मितीचा विक्रम केला आहे.

ठळक मुद्देनिर्मितीचा विक्रम : सेगमेंट बसविल्यानंतर रुळाचे कार्य

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अवघ्या सव्वाचार महिन्यांच्या अल्पावधीत सेगमेंट बनविण्याचे विक्रमी कार्य मेट्रोने पूर्ण केले आहे. सेगमेंट निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मेट्रोने गाठला आहे. मागील १५ महिन्यांत २२६५ सेगमेंट तयार करण्यात आले असून यापैकी १००० सेगमेंट अवघ्या १३२ दिवसात (सव्वाचार महिने) तयार करण्यात आले असून निर्मितीचा विक्रम केला आहे.याशिवाय ११६ आय-गर्डरदेखील या कालावधीत तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात मेट्रोचे कार्य वेगाने पूर्ण होणार आहे. हिंगणा येथील २५ एकर क्षेत्रफळ असलेल्या कास्टिंग यार्डमध्ये सेगमेंटची निर्मिती करण्यात येत आहे. नागपूर मेट्रोच्या रिच-३ मध्ये हे सेगमेंट वापरले जातील. रिच-३ अंतर्गत सीताबर्डी चौक ते लोकमान्यनगर या दरम्यान तयार होणाऱ्या मेट्रो मार्गावर तसेच या मार्गावरील १० मेट्रो स्थानकावर हे सेगमेंट बसवून नंतर रुळाचे कार्य केले जाणार आहे.सेगमेंट तयार करण्यासाठी अत्यंत कुशल कारागिराची गरज भासते. नागपूर मेट्रोच्या निर्मितीसाठी सेगमेंट तयार करण्याचे कार्य १७० कारागीर दिवसरात्र करीत आहेत. याशिवाय २०० पेक्षा जास्त अधिकारी, अभियंते, निरीक्षक आणि तंत्रज्ञ हिंगणा कास्टिंग यार्डमध्ये कार्यरत आहेत. याठिकाणी दररोज १७ तास काम करून ध्येयपूर्तीचा प्रयत्न महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी करीत आहेत.गेल्यावर्षी मार्च महिन्यात सेगमेंट आणि आय-गर्डर तयार करण्याचे कार्य सुुरू करण्यात आले. दररोज १० सेगमेंट तयार करण्यात येते. याठिकाणी ३५२ सेगमेंट व ७२ आय-गर्डर तयार करून खुल्या जागेत ठेवण्याची व्यवस्था आहे. येथून कंटेनरच्या मदतीने कार्यस्थळी पोहोचविल्या जातात. हिंगणा कास्टिंग यार्डात व्हायब्रेटर आणि सिमेंट कॉन्क्रिट तयार करणाºया मिक्सरची परिपूर्ण व्यवस्था आहे. नागपूर मेट्रोच्या रिच-३ चे कार्य पूर्ण होताच हिंगणा औद्योगिक कंपन्यांमध्ये कार्य करणाºया कर्मचाºयांसह अधिकाºयांसाठी मेट्रोचा प्रवास अत्यंत महत्त्वाचा आणि सोयीचा ठरणार आहे. या उद्देशाने नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य वेगाने पूर्ण केले जात आहे.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर