नागपूरला महाव्यवस्थापक संपूर्ण दक्षता चषक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:47 IST2021-02-05T04:47:01+5:302021-02-05T04:47:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य रेल्वेच्या ६५व्या क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यात नागपूर व सोलापूर विभागाला महाव्यवस्थापक संपूर्ण दक्षता ...

नागपूरला महाव्यवस्थापक संपूर्ण दक्षता चषक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या ६५व्या क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळ्यात नागपूर व सोलापूर विभागाला महाव्यवस्थापक संपूर्ण दक्षता चषकाने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या सभागृहात पार पडला.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्या हस्ते यावेळी ८८ रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कृत करण्यात आले. याप्रसंगी २१ आंतरविभागीय दक्षता शिल्डचे वाटप करण्यात आले. स्वच्छतेसाठी भायखळा व साईनगर शिर्डी स्थानकांनी उत्कृष्ट स्टेशन पुरस्कार पटकावले. सर्वोत्कृष्ट वर्गवारित पहिले स्थान सातारा स्थानकाने पटकावले तर डायमण्ड क्रॉसिंग गार्डनसाठी नागपूरला दुसरे स्थान मिळाले आहे. यावेळी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे व सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी संजीव मित्तल यांच्या हस्ते महाव्यवस्थापक संपूर्ण दक्षता चषक स्वीकारला. यावेळी प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी डॉ. ए.के. सिन्हा उपस्थित होते.