शहरं
Join us  
Trending Stories
1
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
2
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
3
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
4
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
5
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
6
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
7
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
8
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
9
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
10
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
11
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
12
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
13
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
14
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
15
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
16
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
17
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
18
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
19
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
20
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर-छत्तीसगडसह देशातील ‘जेन-झी’ला अराजक नव्हे तर शांती हवी

By योगेश पांडे | Updated: November 24, 2025 20:32 IST

सुनिल आंबेकर : संयुक्त राष्ट्र, डब्लूएचओ शोषण दूर करण्यात अपयशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांगलादेश, नेपाळमधील ‘जेन-झी’चे आंदोलन हा तेथील संवैधानिक समस्येंतून निर्माण झालेला मुद्दा होता. भारतातील ही पिढी अराजकतावादी नसून महत्वाकांक्षी आहे. काही देशविरोधी तत्व देशातील ‘जेन-झी’ला भडकविण्याचे षडयंत्र करत आहेत. मात्र काश्मीर असो किंवा छत्तीसगड, देशातील ‘जेन झी’ला शांती हवी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपुरात आयोजित नागपूर पुस्तक महोत्सवादरम्यान ‘झिरो माईल लिटरेचर फेस्टिव्हल’दरम्यान ते बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात लेखक निखील चंदवानी यांनी त्यांची मुलाखत घेतली. आपल्या देशात वेगवेगळ्या टप्प्यांत तरुणांनीच आंदोलने केली व आणीबाणी असो किंवा २०११ सालचे राजधानीतील आंदोलन, त्याची धुरा तरुणांनीच उचलली होती. तरुणांमध्ये देशभक्तीचा भाव वाढला आहे. त्यांना भारतमातेचा जयजयकार करणे किंवा वंदे मातरम म्हणणे ‘कूल’ वाटते. त्यांना देशाचा गर्व वाटतो व ते विकासाच्या गोष्टी करतात, असे आंबेकर म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तिनिर्माण व त्यातून समाज घडविण्याचे काम करत आहे. २०४७ पर्यंत भारताबाबत जगातील अराजकतावादी देशांमध्ये सात्विक भय राहिले पाहिजे. भांडवलशाहीच्या विळख्यातून जगाला मुक्त करणे गरजेचे आहे. संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना भांडवलशाहीचे शोषण दूर करण्यात अपयशी ठरले आहे. भारतातूनदेखील ज्यावेळी वसाहतवादी मानसिकता दूर होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याप्राप्तीला अर्थ येईल, असे आंबेकर म्हणाले.

एकटेपणा ही नवीन पिढीमधील समस्या

एकल कुटुंबपद्धतीमुळे एकटेपणा ही नवीन पिढीमधील समस्या बनते आहे. त्यातूनच ‘फोमो’सारखे मुद्दे समोर येतात. मात्र हा एकटेपणा कुटुंबातूनच दूर होऊ शकतो. त्यासाठी कुटुंबासोबत समाजासोबत जिव्हाळा वाढणे आवश्यक आहे. संघ त्यादृष्टीनेच कार्य करत आहे. असे सुनिल आंबेकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian 'Gen-Z' in Kashmir, Chhattisgarh wants peace, not anarchy.

Web Summary : RSS leader Sunil Ambekar asserts Indian 'Gen-Z' desires peace, not anarchy, unlike movements in Bangladesh and Nepal. He highlighted their patriotism, focus on development, and the need to combat capitalist exploitation and colonial mindsets for true independence. He also addressed loneliness in youth.
टॅग्स :nagpurनागपूर