शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या 'काळ्या सोन्या'त उगवली चक्क 'रत्ने'; ५०० नमुन्यांतून उलगडणार पृथ्वीचा गुप्त खजिना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 06:44 IST

कोळशाच्या काळ्या थरांआड लाखो वर्षे लपून बसलेले दुर्मीळ धातू आता विदर्भाच्या भवितव्याला हिरेजडित तेज देण्यासाठी समोर येत आहेत.

-बालाजी देवर्जनकर, नागपूर विदर्भातील वेस्टर्न कोल्ड फिल्ड्स (डब्ल्यूसीएल) च्या खाणींमध्ये जणू पृथ्वीने स्वतःचा गुप्त खजिनाच उघडला आहे. कोळशाच्या काळ्या थरांआड लाखो वर्षे लपून बसलेले दुर्मीळ धातू आता विदर्भाच्या भवितव्याला हिरेजडित तेज देण्यासाठी समोर येत आहेत. इथे सापडलेले रेनिअम, टायटॅनिअम, पोटॅश आणि टेल्युरिअम यांसारखे मौल्यवान धातू भविष्यात देशाच्या संरक्षण, अवकाश, शेती व हरित ऊर्जा क्षेत्रासाठी 'गेमचेंजर' ठरेल.

'डब्ल्यूसीएल'ने विविध ६ उघड्या खाणींमधून सुमारे ५०० नमुने गोळा केले होते. या नमुन्यांचे घटक विश्लेषण केले असता, त्यात या मौल्यवान धातूंचे अस्तित्व आढळून आले.

खाणींचे नमुने पाठवले हैदराबादच्या प्रयोगशाळेत

सखोल चाचण्यांसाठी नागपूरच्या अदासा व मकरधोकडा-श्री खाणींचे नमुने हैदराबाद येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते.

प्रमाण, शुद्धता आणि आर्थिकदृष्ट्या उत्खननाची व्यवहार्यता निश्चित झाल्यानंतर कंपनी व्यावसायिक उत्खनन व मार्केटिंगचा आराखडा आखणार आहे.

टेल्युरिअम का आवश्यक ?

टेल्युरिअम हा आधुनिक सेमीकंडक्टर आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानातील कळीचा घटक आहे.

रेनिअम : दुर्मीळतेचा सम्राट जगातील सर्वाधिक दुर्मीळ धातूंमध्ये गणना होणा रेनिअम अत्यंत उच्च उत्कलनबिंदूमुळे ओळखला जातो. जेट इंजिन, क्षेपणास्त्रे आणि सुपर-अलॉयज् निर्मितीत तो अपरिहार्य मानला जातो.

टायटॅनिअम : भविष्याचा धातू पोलादाइतका मजबूत पण वजनाने अत्यंत हलक आणि गंजरोधक असा टायटॅनिअम आधुनिक तंत्रज्ञानाचा आधारस्तंभ आहे. इस्रोच्या रॉकेट्सपा विमान उद्योग आणि वैद्यकीय इम्प्लांट्सपर्यंत त्या व्यापक वापर होतो.

पोटॅश : बळीराजाचा हिरा पोटॅश हे शेतीसाठी अत्यावश्यक खनिज असून, खतनिर्मितीतील मुख्य घटक मानले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha's coal mines yield rare minerals; Earth's hidden treasure revealed.

Web Summary : Vidarbha's coal mines unveil a wealth of rare minerals like Rhenium, Titanium, Potash, and Tellurium. These discoveries promise to revolutionize India's defense, space, agriculture, and green energy sectors. WCL collected samples, confirming the presence of these valuable resources, paving the way for commercial mining.
टॅग्स :nagpurनागपूरFarmerशेतकरीscienceविज्ञान