न्यायालयाच्या आवारात पत्रके वाटणारा गजाआड

By Admin | Updated: July 30, 2015 02:45 IST2015-07-30T02:45:07+5:302015-07-30T02:45:07+5:30

न्यायालयाच्या आवारात याकूबच्या फाशीच्या अनुषंगाने पत्रके वाटून एका तरुणाने खळबळ उडवून दिली. मुकेश गोरेलाल अंबोरे असे त्याचे नाव आहे.

Gaza Aad, which appears in the court premises | न्यायालयाच्या आवारात पत्रके वाटणारा गजाआड

न्यायालयाच्या आवारात पत्रके वाटणारा गजाआड

नागपूर : न्यायालयाच्या आवारात याकूबच्या फाशीच्या अनुषंगाने पत्रके वाटून एका तरुणाने खळबळ उडवून दिली. मुकेश गोरेलाल अंबोरे असे त्याचे नाव आहे.
बुधवारी दुपारी १ वाजता तो न्यायालयाच्या बाहेर निघणाऱ्या दाराजवळ आला. तेथे चहा टपरीजवळ सायकल उभी करून तो पत्रके वाटू लागला. बाजूला असलेल्या पोलिसांनी त्याच्याकडची पत्रके हातात घेताच ते हादरले. ‘होशियार हो जाओ शहरवासियो. याकूब को फांसी होते ही शहरमे कई जगह धमाके होने वाले है‘, असे या पत्रकात नमूद होते.
पोलिसांनी लगेच ती पत्रके आणि मुकेशला ताब्यात घेतले. नंतर त्याला सदर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या पत्रकांनी परिसरात काही काळ खळबळ उडवून दिली होती.(प्रतिनिधी)

Web Title: Gaza Aad, which appears in the court premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.