गायनाचार्य उषा पारखी सहस्रचंद्रदर्शन सोहळा

By Admin | Updated: August 14, 2014 01:19 IST2014-08-14T01:19:11+5:302014-08-14T01:19:11+5:30

विदर्भातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शास्त्रीय गायिका गुरू गायनाचार्य डॉ. उषाताई पारखी यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Gayanarya Usha Parakshi Sahasrakshandra Sawal | गायनाचार्य उषा पारखी सहस्रचंद्रदर्शन सोहळा

गायनाचार्य उषा पारखी सहस्रचंद्रदर्शन सोहळा

नागपूर : विदर्भातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ शास्त्रीय गायिका गुरू गायनाचार्य डॉ. उषाताई पारखी यांनी नुकतीच वयाची ८० वर्षे पूर्ण केली. यानिमित्त त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही पारंपरिक भजनांच्या सीडीचे लोकार्पणही क रण्यात आले. हा कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई सभागृह, लक्ष्मीनगर येथे पार पडला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गिरीश गांधी, डॉ. रा. कृ. उपाख्य बाळासाहेब पारखी, स्पीक मॅकेच्या अध्यक्षा डॉ. निशाताई कुळकर्णी, डॉ. उषा पारखी उपस्थित होत्या. डॉ. निशा कुळकर्णी यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी डॉ. उषा पारखी यांच्या दीर्घ व यशस्वी गायन तसेच कौटुंबिक जीवनाचा परिचय करून दिला.
गिरीश गांधी यांनी त्यांचा आत्मीय सत्कार करून आपल्या अभिनंदनपर शुभेच्छा व्यक्त केल्या. उषातार्इंनी मनोगतात या आयोजनाबाबत कृतज्ञता आणि मनस्वी आनंद व्यक्त केला. ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आचार्य विवेक गोखले, पं. चंद्रहास जोशी यांनीही उषातार्इंच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकून त्यांचे अभिनंदन केले.
उषातार्इंचे चिरंजीव राजीव पारखी यांनी प्रारंभी शारदावंदना व गुरूवंदना सादर केली. यावेळी ज्येष्ठ संगीततज्ज्ञ डॉ. बाळासाहेब पुरोहित, पं. मुरलीधर दीक्षित, अण्णाजी गिल्लरकर, डॉ. कल्याणी देशमुख, म. ना. लोही व संगीतप्रेमी रसिक तसेच पुणे येथील अभियंता पदावर कार्यरत असलेले उषातार्इंचे शिष्य व सीडी तील भजनांचे गायक सुदर्शन नासेरी प्रामुख्याने उपस्थित होते.
मीनल, राजीव, अंजली, नितीन, सीमा, अभीन पारखी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Gayanarya Usha Parakshi Sahasrakshandra Sawal