गॅसगळतीमुळे संपूर्ण कुटूंब जळाले
By Admin | Updated: June 23, 2017 13:48 IST2017-06-23T13:48:26+5:302017-06-23T13:48:26+5:30
निष्काळजीपणामुळे कबाड्यासह त्याच्या चिमुकल्याचाही जीव गेला तर पत्नी व मुलीसह पाच जण जबर जखमी झाले.

गॅसगळतीमुळे संपूर्ण कुटूंब जळाले
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कबाडीचा व्यवसाय करणा-या एकाचा निष्काळजीपणा संपूर्ण कुटुंबीयांचे आयुष्यभरासाठी नुकसान करणारा ठरला. या निष्काळजीपणामुळे कबाड्यासह त्याच्या चिमुकल्याचाही जीव गेला तर पत्नी व मुलीसह पाच जण जबर जखमी झाले. १६ जुनच्या दुपारी ३.३० वाजता ही घटना घडली होती.
शेख शकील शेख बशिर (वय ५५) हा कबाडी मोठा ताजबागमधील हिरालाल सोसायटीतील प्यारे पहेलवानच्या चाळीत भाड्याने राहत होता. त्याने कबाडात वाहनाला लावली जाणारी सीएनजी टँक विकत घेतली होती. तिचे आतून पितळ काढत असताना त्याची पत्नी साबिरा रोम हिने स्टोव्ह पेटवला. टाकीत गॅस असल्यामुळे स्टोव्ह पेटविताच भडका उडाला. त्यामुळे शिकल, त्याची पत्नी साबिरा, दोन वर्षांचा रशिद आणि पाच वर्षांची अलफिया तसेच त्यांना वाचवायला धावलेले शेख आबिद (वय २७), शेख आसिफ आणि शाबिर शेख शकील शेख हे सर्व जळून गंभीर जखमी झाले. त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना २० जूनला रात्री ८.४० ला चिमुकला रशिद तर २१ जूनला रात्री ९ च्या सुमारास शकीलचा मृत्यू झाला. उर्वरित चार जण गंभीर जखमी आहे. निष्काळजीपणामुळे झालेल्या बापलेकाच्या मृत्युमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
--