गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प

By Admin | Updated: November 11, 2015 02:07 IST2015-11-11T02:07:49+5:302015-11-11T02:07:49+5:30

ऐन दिवाळीत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे.

Gas cylinder supply jumped | गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प

गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प

अधिकाऱ्यांचे एजन्सींशी हितसंबंध : अ.भा. ग्राहक परिषदेचा आरोप
नागपूर : ऐन दिवाळीत घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाला आहे. एकीकडे ग्राहकांची ओरड सुरू आहे तर दुसरीकडे पुरवठा अधिकारी नरेश वंजारी हिवाळी अधिवेशनात सिलिंडरचा पुरवठा किती करायचा, यातच व्यस्त आहेत.
नागपुरातील धुर्वे गॅस, भेंडे गॅस, ओम गॅस, रश्मी गॅस, विमल गॅस, गावंडे गॅस, डोमेस्टिक गॅस, कोठारी गॅस, कामठी, तिवारी अ‍ॅण्ड कंपनी, कामठी आदी गॅस एजन्सींनी ग्राहकांना घरपोच सेवा देणे जवळपास बंद केले आहे. सिलिंडरचा काळाबाजार सुरू आहे. या एजन्सींवर शासकीय आणि तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचा वचक राहिलेला नाही. सणासुदीत सिलिंडरचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष असल्याचा आरोप अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी यांनी लोकमतशी बोलताना केला.

सबसिडी मिळणे बंद?
घरगुती सिलिंडर ग्राहकांना सबसिडी मिळणे बंद झाले आहे का, असा सवाल ग्राहक करीत आहेत. सिलिंडरची पूर्ण रक्कम भरूनही ग्राहकाच्या खात्यात सबसिडीची रक्कम जमा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. एजन्सींवर कठोर कारवाई करून अधिकाऱ्यांना घरपोच सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी तिवारी यांनी केली. कादंबरी भगत यांना निवेदन देतेवळी परिषदेचे पदाधिकारी किशोर गायधने, अनिल लांजेवार, वीणा पौनीकर, सुनीलदत्त पांडे, डी.के. गोळे, वनश्री सिडाम, डॉ. अनिल वाघ, मनोज बोहरा, विकल्पा पौनीकर, विनायक देशमुख, रणजितसिंग ठाकूर, यशवंत इटनकर, उमाशंकर पांडे, राजू पटेल उपस्थित होते.

धान्य पुरवठा ठप्प
ऐन दिवाळीत रेशन दुकानात साखर आणि गहू पोहोचले नाहीत. आयातीत तूर डाळ खरेदीस ग्राहक उत्सुक नाहीत. १०० रुपये किलो विक्रीचे शासनाचे आदेश असतानाही गावरान डाळ १६० ते १८० रुपये किलो विकली जात आहे. महागाईच्या रेट्यात ग्राहक पिचला जात आहे. गरिबांचे काय होणार, हा चर्चेचा विषय आहे.

वंजारी यांना निलंबित करा
गॅस सिलिंडरचा पुरवठा ठप्प
नागपूर : तिवारी यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी कादंबरी भगत यांची भेट घेऊन नरेश वंजारी यांचे गॅस कंपन्यांशी असलेल्या हितसंबंधावर टीका केली. तिवारी म्हणाले, तीन दिवसांपूर्वी नरेश वंजारी यांची भेट घेऊन ग्राहकांना सिलिंडरचा पुरवठा गोडावूनमधून होत असल्याचे सांगितले होते. पण ते जप्त डाळीचा अहवाल पाठविण्यातच मग्न आहेत.
ग्राहकांच्या हिताकडे कानाडोळा करणारे वंजारी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी तिवारी यांनी भगत यांच्याकडे केली. खापरखेडा येथील कर्मचारी ग्राहक संस्था काळ्या बाजारात सिलिंडरची विक्री करीत आहे तर कामठी येथील कोठारी व तिवारी गॅस एजन्सी पाटणसावंगी येथे रस्त्यावर ट्रक उभा करून ग्राहकांना जास्त दरात सिलिंडर विकत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. (प्रतिनिधी)

Web Title: Gas cylinder supply jumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.