गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:07 IST2021-03-17T04:07:23+5:302021-03-17T04:07:23+5:30
नागपूर : गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला दोन भामट्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळचा लॅपटॉप हिसकावून नेला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ...

गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून लुटले
नागपूर : गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला दोन भामट्यांनी मारहाण करून त्यांच्या जवळचा लॅपटॉप हिसकावून नेला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.
राहुल वसंतराव लेनपाल (वय ३४) हे सुयोग येथे राहतात. ते काटोल मार्गावरील ऑटो एलपीजी गॅस कंपनीत काम करतात. सोमवारी रात्री काम आटोपून ते दुचाकीने आपल्या घराकडे निघाले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाजवळ दुचाकीवर आलेल्या तीन भामट्यांनी त्यांच्या डोक्यावर काठी हाणली. त्यामुळे राहुल यांनी दुचाकी थांबवली. आरोपींनी खाली उतरून राहुल यांना मारहाण केली आणि त्यांच्या जवळची लॅपटॉप असलेली बॅग हिसकावून नेली.
निर्जन रस्ता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे राहुल यांना मदत मिळाली नाही. त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात या लूटमारीची तक्रार नोंदविली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.
---