शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

नागपूर शहरात कचऱ्याचे ढिगारे; यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 23:41 IST

नागपूर शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा कोलमडली  आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वस्त्यात सफाई कर्मचारी नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.

ठळक मुद्देस्वच्छतेचा दर्जा कसा सुधारणार : अनेक वस्त्यांत तीन-चार दिवसात सफाई कर्मचारी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ व सुंदर शहरात देशभरातील अनेक शहरांनी नागपूरपासून धडा घेत स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल स्थानी आले आहेत. यात इंदूर शहराचे उदाहरण देता येईल. नागपूर महापालिकेच्या घराघरातून कचरा संकलन करण्याच्या धर्तीवर इंदूर शहराने यंत्रणा राबवून स्वच्छतेच्या बाबतीत देशभरात पहिला क्रमांक मिळवला. दुसरीकडे देशभरातील टॉप २० शहरात समावेश व्हावा, यासाठी धडपड सुरू असलेल्या नागपूर शहरातील कचरा संकलनाची यंत्रणा कोलमडली  आहे. गेल्या आठवडाभरात अनेक वस्त्यात सफाई कर्मचारी नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.दिवाळीचा सण शहरात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. लक्ष्मीपूजनाला शहरात सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रस्त्यांवर फोडलेल्या फटाक्यांचा कचरा दुसऱ्या दिवशी सोमवारी अनेक वस्त्यात तसाच पडून होता. बाजार भागातही साफसफाई नव्हती. महाल येथील राजविलास टॉकीजच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला कचऱ्याचा ढीग साचला आहे. सायकल स्टँडच्या बाजूच्या गल्लीतही अशीच परिस्थिती आहे. सीताबर्डी उड्डाणपुलाखाली लोकमत चौकाच्या बाजूला कचरा साचून आहे. इतरवारी, सदर व सीताबर्डी यासारख्या बाजार भागात रस्त्यांच्या कडेला जागोजागी कचऱ्याचे ढिगारे लागले आहेत.निवासी भागात अनेक वस्त्यात साफसफाई करणारे कर्मचारी गेल्या दोन-तीन दिवसात फिरकले नाही. प्रमुख रस्त्यांचीही साफसफाई झाली नाही. जागोजागी फटाक्यांचा कचरा तसाच पडून आहे. काही वस्त्यात कचरा संकलन करणारी गाडी फिरली तर काही वस्त्यात फिरली नाही. यामुळे लोकांनी उघड्यावर कचरा टाकला. कचरा संकलन केंद्रावरील कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.नागपूर शहरात दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. हा कचरा संकलित करून भांडेवाडी येथे त्यावर प्रक्रिया करणे अपेक्षित आहे. परंतु भांडेवाडी येथे प्रक्रिया होत नाही. प्रक्रि येच्या नावाखाली भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायोमायनिंग, कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पांचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु अद्याप प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू झालेले नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका