माऊंट राेडवर माेकाट जनावरांचा हैदाेस
नागपूर : माऊंट राेडवर टेकडीच्या शेजारी साचलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माेकाट जनावरांचा हैदाेस चाललेला असताे. ही जनावरे रस्त्यावरच भ्रमण करीत असतात. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागताे. एकदाेनदा या ठिकाणी लहान-माेठे अपघातही झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना भीतभीतच गाडी चालवावी लागते. येथील कचऱ्याचे ढिगारे हटवून माेकाट जनावरांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिव्हिल लाइन्समध्ये खड्डे भरण्याचा देखावा
नागपूर : सिव्हिल लाइन्सस्थित सदर पाेलीस स्टेशनजवळचा रस्ता काही दिवसांपूर्वी केबल टाकण्यासाठी खाेदण्यात आला हाेता. काम झाल्यानंतर खड्डे भरणे अपेक्षित हाेते. मात्र, कंत्राटदाराने खड्डे भरण्याच्या नावाने थातूरमातूर काम केले. निकृष्ट कामामुळे खड्ड्यात टाकलेले सिमेंट निघत असून पुन्हा खड्डे पडायला लागले आहेत. यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागताे.
Web Title: Garbage piles up everywhere on the road
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.