लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते.मनपाने एजी एन्व्हायरो व बीव्हीजी कंपन्यांना शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी दिली आहे. शहराचे दोन भाग करून प्रत्येक कंपनीकडे पाच झोनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपन्याकडून वेतन वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पीएफ जमा केला जात नाही. तसेच दोन महिन्याचे वेतन न दिल्याने या कंपनीच्या हजाराहून अधिक सफाई कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारनंतर काम बंद आंदोलन पुकारले. यावर तोडगा न निघाल्याने शनिवारी सुध्दा एक ते पाच झोनमधील कचरा संकलन बंद होते.शहरात कोविड -१९ चा संसर्ग वाढत असताना सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्याने मनपा प्रशासनाने एजी एन्व्हायरो कंपनी व्यवस्थापनाला संपावर तात्काळ तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहे.कंपनीने कर्मचाऱ्यांना वेतन देण्याला शुक्रवारी सुरुवात केली आहे. कर्मचाऱ्यांचे खाते वेगवेगळ्याा बँकेत असल्याने काही कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याला विलंब होत असल्याची माहिती उपायुक्त डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
नागपुरात अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 00:48 IST
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते.
नागपुरात अर्ध्या शहरातील कचरा संकलन ठप्प
ठळक मुद्देवेतन न मिळाल्याने एजी एन्व्हायरो कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा संप