न्यायमंदिराच्या प्रवेशद्वारावर महिलेच्या पर्समध्ये गांजा
By Admin | Updated: September 6, 2014 03:04 IST2014-09-06T03:04:29+5:302014-09-06T03:04:29+5:30
न्यायमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका महिलेच्या पर्समध्ये गांज्याच्या पुड्या आढळून आल्या.

न्यायमंदिराच्या प्रवेशद्वारावर महिलेच्या पर्समध्ये गांजा
नागपूर : न्यायमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका महिलेच्या पर्समध्ये गांज्याच्या पुड्या आढळून आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार कोराडी महादुला येथील कविता सतीश वाघमारे ऊर्फ रेहाना रसिक शेख (२३) आणि तिचा पती रसिक शेख हे प्रवेशद्वारातून न्यायमंदिराच्या आत जात असताना रेहानाची महिला पोलीस कॉन्स्टेबल रेखा मडावी यांनी तर कॉन्स्टेबल राहुल बारापात्रे यांनी रसिक शेख याची अंगझडती घेतली. झडती दरम्यान रेहानाच्या पर्समध्ये गांजाच्या दोन पुड्या आढळून आल्या. लागलीच या दोघांनाही ताब्यात घेऊन सदर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रसिक शेख याचे भादंविच्या कलम ३०७ च्या प्रकरणावर सुनावणी असल्याने तो पत्नीला घेऊन न्यायालयात आला होता, असे त्याने पोलिसांना सांगितले. गांजाच्या पुड्या बाळगण्याचा काय हेतू होता, या पुड्या कारागृहातून पेशीसाठी आणणाऱ्या आरोपींना दिल्या जाणार होत्या काय, या दिशेने या दाम्पत्याची विचारपूस केली जात आहे. (प्रतिनिधी)