शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

गांजा तस्करांचे धाबे दणाणले! रेल्वेतील 'नार्कोस टीम'चा अचूक वेध

By नरेश डोंगरे | Updated: August 7, 2025 20:07 IST

रॅक्स, मॅक्स, सिकंदर, योद्धाकडून तस्करांची दाणादाण : रेल्वे सुरक्षा यंत्रणांत ठरले ‘द रियल हिरो’

नरेश डोंगरेलोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : रॅक्स, मॅक्स, लुसी, सिकंदर, योद्धा ही नावे सध्या रेल्वेतील सुरक्षा यंत्रणांमध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहेत. ‘ऑपरेशन नार्कोस’मध्ये ते सलग बजावत असलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे रेल्वेतून गांजा तस्करी करणारांची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. त्याचमुळे सुरक्षा यंत्रणांत ही नावे 'रियल हिरो'सारखी लोकप्रिय झाली आहेत.

ओडिशातील संभलपूरनजीकच्या भागात मोठ्या प्रमाणात गांजा पिकविला जातो. अत्यंत स्वस्त दरात तो उपलब्ध असल्याने आणि ओडिशा, पश्चिम बंगाल या दोन प्रांतात तो पकडला जाणार नाही, अशी गांजा माफियांकडून हमी मिळत असल्याने ठिकठिकाणचे तस्कर तेथून गांजा खरेदी करतात. तो रेल्वे गाड्याने नागपुरात येतो. येथून महाराष्ट्रासह छत्तीसगड, एमपी, कर्नाटक, यूपी, दिल्लीमध्ये पाठविला जातो. गेल्या काहीर वर्षांत गांजा तस्करीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. ते लक्षात घेऊन रेल्वेच्या तपास यंत्रणांनी ‘ऑपरेशन नार्कोस’ सुरू केले. यात नमूद पाच श्वान अत्यंत मोलाची कामगिरी बजावत आहेत. स्थानकांवरील अडगळीची जागा असो की प्रवाशांना बसण्यासाठी लावलेले बेंच. ट्रेनमधील वरचा असो की खालचा बर्थ कोणत्याही ठिकाणी पडून असलेली बॅग. ‘नार्कोस’चे हिरो अचूक वेध घेतात. विशिष्ट गंध-सुगंध येताच ते आपल्या हॅण्डलरला संकेत देतात अन् गांजा तस्करीचा डाव उधळून लावतात. ऑपरेशन नार्कोसच्या माध्यमातून तस्करांमध्ये प्रचंड दहशत निर्माण करणाऱ्या श्वानांमधील रॅक्स, मॅक्स आणि लुसी रेल्वे सुरक्षा दलात (आरपीएफ) तर, सिकंदर आणि योद्धा रेल्वे पोलीस (जीआरपी)मध्ये कार्यरत आहेत.

दीड वर्षांत २५ कारवाया; ४६१ किलो गांजा जप्तया श्वानांनी २०२४ मध्ये १५ रेल्वे गाड्या आणि स्थानकांमध्ये ३९३ किलो गांजा तर, यावर्षी गेल्या सहा महिन्यात १० वेगवेगळ्या ठिकाणी ६८ किलो गांजा पकडून दिला आहे. सोबत २७ गांजा तस्करही पकडले गेले आहेत.

मोडस ऑपरेंडी बदलली : सुरक्षा आयुक्तगांजा तस्करी सलग उघड होत असल्याने तस्करांचे धाबे दणाणले आहे. त्यांनी आता आपली मोडस ऑपरेंडी बदलवली आहे. तस्कर गांजाचे बंडल ट्रेनच्या एका कोचमध्ये लपवितात आणि पकडले जाऊ नये म्हणून स्वत: दुसऱ्याच बर्थवर बसतात, असे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य सांगतात.

टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वेSmugglingतस्करीDrugsअमली पदार्थ