शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील प्रतापनगरात गुंडांची दहशत : जिवे मारण्याचीही धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 23:41 IST

प्रतापनगरातील चार गुंडांनी एका पंक्चरवाल्याच्या हत्येचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे दुकान पेटवून दिले. या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देपंक्चरवाल्याची दुकान जाळले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगरातील चार गुंडांनी एका पंक्चरवाल्याच्या हत्येचा प्रयत्न केला आणि नंतर त्याचे दुकान पेटवून दिले. या घटनेमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोहमद सादिक अन्सारी (वय २३) असे फिर्यादीचे नाव असून तो जयताळा परिसरात राहतो. प्रतापनगरातील राधे मंगल कार्यालयाच्या समोर त्याचे पंक्चरचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री ८.४५ च्या सुमारास चिंटू मरस्कोल्हे, राकेश मरस्कोल्हे आणि त्याचे दोन साथीदार सादिकच्या दुकानावर आले. त्यांनी सादिकसोबत वाद घालून त्याला शिवीगाळ करून मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याच्या मागे चाकू घेऊन धावले. जीव मुठीत घेऊन पळाल्यामुळे सादिक वाचला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर आरोपींनी त्याच्या पंक्चरच्या दुकानाला आग लावून पेटवून दिले. यामुळे गरीब सादिकचे ६५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. दुकान पेटवल्याची घटना शनिवारी सकाळी ६ च्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर सादिकने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी विविध कलमानुसार आरोपी मरस्कोल्हे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर