महिलेचे अपहरण करून ‘गँगरेप’

By Admin | Updated: August 18, 2016 02:09 IST2016-08-18T02:09:27+5:302016-08-18T02:09:27+5:30

गोकुळपेठ येथील बाजारातून एका विवाहित महिलेचे अपहरण करून गँगरेप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Gangraped by kidnapping woman | महिलेचे अपहरण करून ‘गँगरेप’

महिलेचे अपहरण करून ‘गँगरेप’

सहा आरोपी अटकेत : रामनगर येथील घटना
नागपूर : गोकुळपेठ येथील बाजारातून एका विवाहित महिलेचे अपहरण करून गँगरेप करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी रात्री रामनगर येथील एका जीर्ण बेवारस असलेल्या घरात ही घटना घडली. महिलेने बुधवारी सकाळी पतीसोबत पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. अंबाझरी पोलिसांनी गँगरेपचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी गजानन राजू शनेश्वर (२२) रा. पांढराबोडी, गोलू ऊर्फ भूपेश रगडे (२०) रा. महाराजबाग क्वॉर्टर, राहुल मधुकर तितरमारे (२६) रा. संजयनगर, रहीम शेख मो. शरीफ शेख (२८) अरविंद मधुकर कोडापे (२७) रा. तेलंगखेडी आणि मयुर गणेश नेवारे (२२) रा. फुटाळा या आरोपींना अटक केली. अनिल डोंगरे नावाचा आरोपीचा साथीदार फरार आहे. आरोपी मजुरी करतात. पीडित ४० वर्षीय महिला विवाहित आहे. तिची गजानन आणि अनिलसोबत ओळख आहे. गोकुलपेठ बाजारात तिचे नाश्त्याचे दुकान आहे. विवाहितेच्या तक्रारीनुसार १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी गजानन आणि अनिल तिच्या दुकानात आले. त्यांनी तिला काम मागितले.
ती कामात व्यस्त असल्याने तिने गजाननला पिण्यासाठी पाणी मागितले. गजाननने तिला पिण्यासाठी पाणी दिले. त्यात बेशुद्धीचे औषध मिसळले होते. ते पिताच ती बेशुद्ध झाली.

कधी थांबतील अत्याचार ?
महिलेचे अपहरण करून ‘गँगरेप’
नागपूर : सायंकाळी ७ वाजता गजानन आणि अनिल तिला आॅटोत बसवून रामनगर आणि तेलंगखेडी यांच्यामध्ये असलेल्या एका जीर्ण घरात घेऊन गेले.
हे घर अनेक वर्षांपासून बेवारस अवस्थेत आहे. त्यावेळी रात्रीचे ९ वाजले होते. गजानन आणि अनिलने तिच्यावर अत्याचार केला. ते गेल्यानंतर गोलू आणि राहुल आले. त्यांनीही तिच्यावर अमानवीय अत्याचार केला. ते गेल्यावर रहीम, मयुर आणि अरविंद आले. त्यांनीही तिच्यावर अत्याचार केला.
या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपींनी विवाहितेचे सायंकाळी ७ वाजता गोकुळपेठ बाजारातून अपहरण केले.
त्यावेळी बाजारात चांगलीच गर्दी होती. तरीही आरोपींना पकडले जाण्याची भीती नव्हती.(प्रतिनिधी)

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
नंदनवन येथील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सप्रेम खेमदास मानकर (२१) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा आरोप आहे की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. परंतु नंतर मात्र लग्नास नकार दिला.

 

Web Title: Gangraped by kidnapping woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.