शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

कॉल सेंटरमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये तीन तरुणींचाही समावेश, दोघींना अटक   

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 08:18 IST

शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे, सामूहिक बलात्काराच्या या घृणित गुन्ह्यात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील आरोपी आहेत.

नागपूर, दि. 24 - शीतपेयात गुंगीचे औषध देऊन दोन ते चार जणांनी एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. विशेष म्हणजे, सामूहिक बलात्काराच्या या घृणित गुन्ह्यात पीडित तरुणीच्या मैत्रिणीदेखील आरोपी आहेत.पीडित तरुणी (वय २१) एका कॉल सेंटरमध्ये काम करते. तेथेच काम करणा-या सुप्रिया पाटील (रा. उदयनगर) सोबत तसेच कॅटरर्समध्ये काम करणाºया लीना ऊर्फ श्रेया धांदेसोबत तिची मैत्री होती. सुप्रिया आणि लीनाची एक मैत्रिण मानकापूरला सदनिकेत राहते. १० सप्टेंबरला दुपारी १२.३० वाजता सुप्रिया आणि लीनाने पीडित मुलीला उदयनगरातून मानकापूरला मैत्रिणीच्या सदनिकेत नेले. तेथे एक अनोळखी व्यक्ती होती. पीडित तरुणीला आरोपींनी शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तिची शुद्ध हरपल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत दोन ते चार आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. ती शुद्धीवर आल्यानंतर तिला असह्य वेदना होऊ लागल्या. शुद्धीवर आल्यानंतर तिने याबाबत मैत्रिणींना जाब विचारला असता त्यांनी तिला बदनामीचा धाक दाखवून गप्प बसण्याचा सल्ला दिला. पुन्हा पुन्हा कॉलबदनामीच्या धाकाने पीडित तरुणी गप्प बसल्यानंतर आरोपी तिला वारंवार तेथे येण्यासाठी फोन करू लागले. त्यांचा त्रास वाढत चालल्यामुळे पीडित तरुणी शनिवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यात पोहचली. तिने तेथे सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवली. सहायक निरीक्षक प्रवीण आवटे यांनी तीन तरुणींसह चार आरोपींविरुध्द सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी धावपळ करून सुप्रिया आणि लीनाला अटक केली. प्राथमिक तपासात या तरुणीवर अनेकांनी बलात्कार केल्याचा संशय बळावला आहे. पोलीस या प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. हुडकेश्वरमध्ये खळबळहुडकेश्वर परिसरात महिनाभराच्या कालावधीत घडलेला सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा होय. अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याचा गुन्हा तीन आठवड्यांपूर्वी घडला होता. पीडित मुलीला तेथील ठाणेदार सुनील झावरे यांनी मारहाण केल्याने हे प्रकरण चांगलेच वादग्रस्त झाले होते. त्याची चौकशी पोलीस उपायुक्तांकडून करण्यात येत असल्याचे वरिष्ठांनी सांगितले होते. मात्र, या चौकशी अहवालाच्या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस