शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गंगा नदी सकारात्मक उर्जेचा स्रोत  : अर्जुन मेघवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:23 IST

जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली.

ठळक मुद्दे गंगा स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रिया पूर्णत्वाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जगभरात अनेक नद्या वाहतात. मात्र गंगा नदीतील पाण्याचे गुण इतर ठिकाणी आढळून येत नाहीत. गंगा नदीच्या पाण्यात ‘ब्रह्मतत्त्व’ आहे की नाही, यावर संशोधन सुरू आहे. मात्र ‘नीरी’तसेच आणखी काही संस्थांच्या प्राथमिक अहवालातून गंगा नदीच्या पाण्यात सकारात्मक ऊर्जेचा स्रोत असल्याची बाब समोर आली आहे, अशी माहिती जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुज्जीवन राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी दिली. १६ फेब्रुवारीपासून मंत्रालयाच्या पुढाकाराने शहरात ‘भूजल मंथन’चे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी पत्रपरिषदेदरम्यान माहिती देताना ते बोलत होते.गंगा नदीच्या स्वच्छतेसंदर्भात केंद्र सरकार गंभीर असून ‘नमामि गंगे’ प्रकल्पावर आतापर्यंत १४१२७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यानुसार गंगा नदीच्या किनाºयावर असलेल्या शहरांसाठी एकूण ९७ ‘एसटीपी’ (सिव्हेज ट्रीटमेन्ट प्लॅन्ट) प्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. याशिवाय इतर प्रकल्प मिळून ही संख्या १८७ असून यातील ४७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्याचे काम जोरात सुरू असून मार्चअखेर उर्वरित प्रकल्पांची निविदा प्रक्रियादेखील पूर्ण होईल. गंगा नदीच्या किनाºयावर अनेक ठिकाणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात ‘बॅक्टेरिआ’चे प्रमाण कमी दिसून येते, असेदेखील अर्जुन मेघवाल यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय भूमी जल बोर्डाचे अध्यक्ष के.सी.नाईक, सुधीर दिवे प्रामुख्याने उपस्थित होते.गडकरींमुळे ‘नमामि गंगे’ला गतीगंगा स्वच्छता करण्यावर आमचा भर असून या विभागाच्या माजी मंत्री उमा भारती यांच्या कार्यकाळात अनेक नव्या गोष्टींना सुरुवात झाली. त्यांचे काम अतिशय चांगले होतेच, मात्र नितीन गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी कामाचा धडाकाच लावला आहे. त्यांच्यामुळे ‘नमामि गंगे’ प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन अर्जुन मेघवाल यांनी केले.

टॅग्स :riverनदीnagpurनागपूर