कळमन्यात विवाहितेवर गँगरेप
By Admin | Updated: September 9, 2015 02:57 IST2015-09-09T02:57:19+5:302015-09-09T02:57:19+5:30
शेजारी राहाणाऱ्या दोन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

कळमन्यात विवाहितेवर गँगरेप
नागपूर : शेजारी राहाणाऱ्या दोन नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. रविवारी मध्यरात्री १२.३० वाजता ही घटना घडली तर, सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
कळमन्यातील चिखली वसाहतीत राहाणारी एका गरीब परिवारातील महिला (वय २८) आपल्या कुटुंबीयांसोबत झोपली होती. रविवारी मध्यरात्री बाजूलाच राहाणारे आरोपी अल्तमस आणि आकाश यांनी सदर महिलेला घराबाहेर बोलविले. नंतर तिला एका घराच्या स्लॅबवर नेले आणि तेथे तिच्याशी आळीपाळीने कुकर्म केले. दरम्यान, हे कुकर्म सुरू असताना पीडित महिलेच्या पतीला जाग आली. पत्नी अंथरूणावर दिसत नसल्यामुळे तो घराबाहेर येऊन तिला शोधू लागला. काही वेळेनंतर त्याला आरोपी अल्तमस आणि आकाश बाजूच्या घराच्या स्लॅबवरून उतरताना दिसले. त्यांच्या मागे त्याची पत्नीही येत होती. त्यामुळे त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पत्नी घरी आल्यानंतर त्याने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर पतीने पत्नीला बदडणे सुरू केले. आरडाओरडीमुळे शेजारी जागे झाले. त्यानंतर अल्तमास आणि आकाशने सामूहिक बलात्कार केल्याची तक्रारवजा माहिती महिलेने सांगितली. पतीने तिला घेऊन सोमवारी सकाळी कळमना ठाणे गाठले. बलात्काराची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पीडित महिला २८ वर्षांची असून, दोन्ही आरोपी १९ वर्षे वयाचे आहे. या दोघांना मंगळवारी कोर्टात हजर करून त्यांचा १४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला.