अमरावती जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST2021-07-08T04:06:55+5:302021-07-08T04:06:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने अमरावती जिल्ह्यात जाऊन एका सराईत वाहनचोरट्याच्या टोळीला जेरबंद केले. ...

Gang of two-wheeler thieves arrested in Amravati district | अमरावती जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद

अमरावती जिल्ह्यातील दुचाकीचोरांची टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाने अमरावती जिल्ह्यात जाऊन एका सराईत वाहनचोरट्याच्या टोळीला जेरबंद केले. त्यांच्याकडून १७ दुचाकींसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजभवन गार्डनजवळ राहणारे विराग शामराव भेलावे (४५) यांची बुलेट २६ आणि २७ जूनच्या दरम्यान चोरीला गेली होती. पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, एपीआय निलेश गोसावी, नायक श्रीकांत साबळे, सचिन आंधळे, पंकज लांडे आणि हिमांशू ठाकूर यांनी समांतर तपास सुरू केला. आरोपी अमरावती जिल्ह्यातील असल्याचे कळताच पोलीस पथकाने तिकडे जाऊन आरोपी संकेत दीपक कडू (१९, रा. श्रीनगर देवमाळी, परतवाडा), साहिल दिनेश डवरे (२०, रा. तोंडगाव, चांदूर बाजार) आणि अभिजीत संजय खडसे (२१, रा. रामापूर, अचलपूर) यांच्या मुसक्या बांधल्या. आरोपींकडून १७ दुचाकी तसेच साहित्यांसह १४ लाख, २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---

अनेक गुन्हे उघड

या टोळीकडून वाहनचोरीचे अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. त्यांनी नागपूरसह आणखी कुठे गुन्हे केले, त्याचाही तपास केला जात आहे.

----

Web Title: Gang of two-wheeler thieves arrested in Amravati district