चोरट्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:07 IST2021-06-02T04:07:42+5:302021-06-02T04:07:42+5:30

पाच गुन्हे उघड : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कळमना पोलिसांनी चोरट्यांच्या एका टोळीला अटक ...

A gang of thieves is in police custody | चोरट्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

चोरट्यांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

पाच गुन्हे उघड : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कळमना पोलिसांनी चोरट्यांच्या एका टोळीला अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीने तीन घरफोड्या आणि दोन वाहन चोऱ्या अशा पाच गुन्ह्यांची कबुली दिली.

सौरभ प्रमोद पाल, दीपक चंदू बघेल, ईश्वरी सीताराम शाहू आणि पिल्लू काशीराम शाहू अशी या टोळीतील चोरट्यांची नावे आहेत.

कळमण्यातील चिखली देवस्थान परिसरात असलेल्या मनीष हरीश सावलानी यांच्या गोदामाचे शटर तोडून या टोळीने २२ मे च्या पहाटे ६० हजाराची सुपारी चोरून नेली होती. हा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन उपरोक्त चोरट्यांना अटक केली. त्यांची पोलीस कोठडी मिळवून त्यांच्याकडून तीन घरफोड्या तसेच दोन वाहन चोरीचे गुन्हे उघड केले. चोरट्यांकडून चोरीच्या दोन दुचाकीसह तीन लाख, ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल, सहायक आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांनी ही कारवाई केली.

---

Web Title: A gang of thieves is in police custody