नागपुरात शस्त्रांच्या धाकावर लुटमार करणारी टोळी सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 22:15 IST2019-05-11T22:14:25+5:302019-05-11T22:15:06+5:30
नारळ कापणाऱ्या विळ्याच्या धाकावर रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना लुटणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली. या टोळीत दोन अल्पवयीनसह पाच आरोपीचा समावेश आहे.

नागपुरात शस्त्रांच्या धाकावर लुटमार करणारी टोळी सापडली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नारळ कापणाऱ्या विळ्याच्या धाकावर रात्री उशिरा ये-जा करणाऱ्यांना लुटणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली. या टोळीत दोन अल्पवयीनसह पाच आरोपीचा समावेश आहे.
अक्षय नरेंद्र बन्सोड (१८) वष्करीबाग, निखील सुनील टेंभुर्णे (१९), आकाश कैलास गणवीर रा. मोतीबाग, पाचपावली आणि दोन अल्पवयीन असे आरोपीची नावे आहे. आरोपींनी २१ एप्रिल रोजी मध्यरात्री ३.३० वाजता सीताबर्डी, आनंद टॉकीज चौकात कमलेश देशमुख नावाच्या युवकाला अडवून धारदार शस्त्राच्या धाकावर त्याचा मोबाईल व पर्स लुटली होती. यानंतर सीताबर्डीतील टेकडी रोडवर राजस्थानी महिला मंडळ भवनासमोर बॅकवाल्या युवकाला पहाटे ४.३० वाजता रोखून विळ्याने जखमी केले आमि त्याचा मोबाईल व पर्स लुटली.
डीसीपी चिन्मय पंडित यांनी शनिवारी पत्रपरिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रात्री उशिरा किंवा पहाटे पादचाºयांना अडवून, त्यांना जखमी करून लुटण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत ठाणेदार जगवेंद्रसिंग यांनी पीएसआय काळे, ए.पी. राऊत, हवालदार अजय काळे, ओमप्रकाश भारतीय, विशाल अंलवार, प्रीतम यादव, संदीप भोकरे, पंकज निकम यांच्या चमूवर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. या चमूला घटनास्थळाजवळ एक अॅक्टीव्हा गाडीवर संशयास्पद युवक फिरतानाचे फुटेज आढळून आले. तो पाचपावली पोलीस क्वॉर्टरमागे राहत असल्याची माहिती मिळाली. त्याला लष्करीबाग येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने आपल्या साथीदारासोबत लुटमार करीत असल्याची कबुली दिली. त्याच्या सांगण्यानुसार लष्करीबाग रेल्वे लाईनजवळून पर्स, तीन एटीएम कार्ड जप्त करण्यात आले. यानंतर अक्षयला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून शस्त्र, चोरीचे मोबाईल व इतर वस्तुंसह १ लाख २० हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला.