शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
2
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
3
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
4
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
5
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
6
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
7
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
8
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
9
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
10
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
11
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
12
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
14
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
15
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
16
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
17
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
18
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
19
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट
20
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'

नागपुरात दारू पाजून विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:06 IST

महाविद्यालयीन विद्यार्थिनीस जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ठळक मुद्देदोन आरोपींना अटक : बेलतरोडी परिसरातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीस जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना बेलतरोडी पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.निखील सोमकुवर (२५) आणि वतन गोमकाळे (२५), अशी आरोपींची नावे आहेत. पीडित १८ वर्षीय युवती बी. कॉम. पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ती आई आणि लहान भावासोबत राहते. घटनेचा सूत्रधार निखील सोमकुवर आहे. तो विद्यार्थिनीच्या आईच्या नातेवाईकाच्या ओळखीचा आहे. त्यामुळे पीडित विद्यार्थिनीही त्यास ओळखते. निखील पूर्वी मुंबईत काम करीत होता. काही दिवसांपासून तो नागपूरला आला आहे. खासगी कंपनीत तो मॅनेजर आहे. तीन महिन्यापासून त्याची विद्यार्थिनीशी फेसबुकवर फ्रेंडशिप आहे. यामुळे त्यांच्यात मैत्री वाढली. विद्यार्थिनीची आई सकाळी ड्युटीवर तर भाऊ शाळेत जातो. १७ जुलैला निखील विद्यार्थिनीच्या घरी आला. तो तिचा हात पकडून बेडरुममध्ये घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. विद्यार्थिनीने ही घटना कुणाला न सांगितल्याने निखीलची हिंमत वाढली. विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, १९ जुलैला दुपारी १.३० वाजता निखील आपला मित्र वतन गोमकाळे याच्यासोबत घरी आला. त्याच्याजवळ बीअरची बाटली होती. त्यांनी बीअर घेतली. विद्यार्थिनीलाही जबरदस्तीने बीअर पाजली. त्यानंतर दोघांनीही तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कुणाला सांगितल्यास भावासह जीवे मारण्याची धमकी देऊन ते फरार झाले. काही दिवसांपासून विद्यार्थिनीच्या आईला मुलीच्या वागणुकीवर संशय आला. तिने नातेवाईकांच्या मदतीने मुलीची चौकशी केली. विद्यार्थिनीने घडलेली घटना सांगितल्यानंतर बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलीस आरोपींची चौकशी करून घटनेची माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारStudentविद्यार्थी