शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नवऱ्याच्या धाकाने बहिणीकडे निघालेल्या महिलेवर सामुहिक बलात्कार; सहानुभूतीचा आव आणला अन्...

By नरेश डोंगरे | Updated: April 28, 2024 23:07 IST

मध्यरात्री एकटीला सोडून आरोपींचे पलायन...

नागपूर : मारकुंड्या नवऱ्याच्या छळामुळे कंटाळून बहिणीकडे निघालेल्या एका महिलेचे रेल्वे स्थानक परिसरातून अपहरण करून 'फटफटीवाल्या' नराधमाने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. स्वत: तोंड काळे केल्यानंतर त्याने त्याच्या साथीदाराकडूनही या महिलेवर बलात्कार करवून घेतला. तिरोडा रेल्वे स्थानकाजवळच्या जंगलात ही संतापजनक घटना घडली.पीडित महिला (४८) वर्षांची असून ती गोंदिया जिल्ह्यातील एका गावखेड्यात राहते. तिचा पती तिला नेहमी मारहाण करतो. सततच्या मारहाणीमुळे तिची प्रकृती बिघडल्याने ती बिचारी एकटीच येऊन तिरोड्याच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाली. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर तिला डॉक्टरांनी शुक्रवारी २६ एप्रिलला दुपारी सुटी दिली. घरी गेली तर मारकुंडा नवरा परत तुटून पडेल, खायला मिळणार नाही. पुन्हा प्रकृती खालावेल, या भीतीपोटी ती महिला मध्य प्रदेशात राहणाऱ्या बहिणीच्या घरी जाण्याच्या विचाराने तिरोडा रेल्वे स्थानकावर आली. फलाटावरच्या पानपोईजवळ ती बसली असताना दुपारी ३ च्या सुमारास एक व्यक्ती तिच्याजवळ आला.

'येथे कशाला बसली, कुठे जायचे आहे', अशी विचारणा करू लागला. महिलेने त्याला 'भला माणूस' समजून कैफियत ऐकवून मध्य प्रदेशातील बहिणीकडे जायचे आहे, असे सांगतिले. त्या नराधमाने येथून मध्य प्रदेशात कुठलीही गाडी जात नाही, असे सांगून मी तुला तेथे पोहचवून देतो, असे म्हणत आपल्या मोटरसायकलवर बसवले. प्रारंभी त्याने बाजुच्या गावातील मामांच्या घरी नेले. तेथे त्याच्या मामाला संशय आल्याने त्यांनी या महिलेला जेथून आणले तेथे ताबडतोब नेऊन सोड, असे सांगितले. त्यामुळे हा नराधम तिला स्वत:च्या घरी घेऊन गेला. महिलेने घरात जाण्यास नकार दिला. त्यामुळे त्याने तिला पुन्हा मोटरसायकलवर बसवून रात्री ११ च्या सुमारास बाजुच्या जंगलात नेेले. तेथे तणसाच्या ढिगाऱ्यावर त्याने दोनदा तिच्यावर बलात्कार केला. हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही तर शेतातील रामू नामक साथीदाराला आवाज देऊन त्याच्याकडूनही बलात्कार करवून घेतला. भयाण रात्री तिला तशाच अवस्थेत सोडून दोन्ही आरोपी तेथून पळून गेले.गावकऱ्यांनी केली मदतप्रचंड घाबरलेली अत्याचारग्रस्त महिला सैरावैरा पळत रस्त्यावर आली. तेथे तिला गावकरी दिसले. त्यांना तिने आपबिती सांगितली. त्यांनी लगेच दवणीवाडा पोलिसांना कळविले. घटना रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील असल्यामुळे दवणीवाडा पोलिसांनी पीडित महिलेला गोंदिया रेल्वे पोलिसांकडे नेले. तेथे पीडितेच्या तक्रारीवरून शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.'फटफटीवर' वरून आरोपीचा छडा -पडित महिला अत्यंत भोळी आहे. ती आरोपीला ओळखत नव्हती. तो फटफटीवर होता, एवढीच माहिती तिने पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे मोटरसायकलचा नंबर मिळवला आणि त्या आधारे मुख्य आरोपी तसेच त्याच्या साथीदाराच्या शनिवारी रात्री मुसक्या बांधल्या. दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठांकडून प्रकरणाच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणhusband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस